S M L

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्रमय चरित्र

06 डिसेंबरडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ फोटो असलेलं चित्रमय चरित्र नुकतंच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले. बाबासाहेबांच्या आयुष्यातील वेगळे क्षण टिपणार्‍या या 22 व्या खंडाचा उद्देश आहे, बोलक्या फोटो आणि सोप्या भाषेतून नव्या पिढीपर्यंत बाबासाहेब आंबेडकर पोहचवणे. बाबासाहेबांचा सगळ्यात जुना फोटो 1915 सालचा... म्हणजे 95 वर्ष जुना. तर कित्येक फोटो अगदी 1956 पर्यंतचे. त्यांच्या अनेक वेगळ्या भावमुद्रा टीपणारे हे फोटो. बाबासाहेबांच्या असंख्य चाहत्यांनी आपल्या जवळचे हे फोटो प्रसिद्ध करण्यासाठी दिले. 1976 पासून बाबासाहेबांचे चरीत्र सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला. त्यातले 16 खंड वसंत मून यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तर पुढचे खंड हरी नरके यांच्या समितीने 22 पर्यंतचे खंड संपादीत केले.या चरित्राचं वैशिष्ठ्य म्हणजे फोटोंसह बाबासाहेबांनी वेगवेगळ्या प्रसंगी मांडलेले विचार आणि सोप्या भाषेत लिहिलेल्या महत्वाच्या घटना.फोटो दुर्मिळ असल्याने त्यावर प्रक्रिया करणं हे खूप जिकरीचे काम होते. आज आपल्या हातात पुस्तक येते ते अतिशय उत्तम दर्जाचा पेपर वापरलेले. फोटोंचं बोलकेपण टीकवण्यासाठी हे पुस्तक सिंगापूर हून प्रिंट करुन आणलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 10:47 AM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्रमय चरित्र

06 डिसेंबर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ फोटो असलेलं चित्रमय चरित्र नुकतंच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले. बाबासाहेबांच्या आयुष्यातील वेगळे क्षण टिपणार्‍या या 22 व्या खंडाचा उद्देश आहे, बोलक्या फोटो आणि सोप्या भाषेतून नव्या पिढीपर्यंत बाबासाहेब आंबेडकर पोहचवणे.

बाबासाहेबांचा सगळ्यात जुना फोटो 1915 सालचा... म्हणजे 95 वर्ष जुना. तर कित्येक फोटो अगदी 1956 पर्यंतचे. त्यांच्या अनेक वेगळ्या भावमुद्रा टीपणारे हे फोटो. बाबासाहेबांच्या असंख्य चाहत्यांनी आपल्या जवळचे हे फोटो प्रसिद्ध करण्यासाठी दिले. 1976 पासून बाबासाहेबांचे चरीत्र सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला. त्यातले 16 खंड वसंत मून यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तर पुढचे खंड हरी नरके यांच्या समितीने 22 पर्यंतचे खंड संपादीत केले.

या चरित्राचं वैशिष्ठ्य म्हणजे फोटोंसह बाबासाहेबांनी वेगवेगळ्या प्रसंगी मांडलेले विचार आणि सोप्या भाषेत लिहिलेल्या महत्वाच्या घटना.फोटो दुर्मिळ असल्याने त्यावर प्रक्रिया करणं हे खूप जिकरीचे काम होते. आज आपल्या हातात पुस्तक येते ते अतिशय उत्तम दर्जाचा पेपर वापरलेले. फोटोंचं बोलकेपण टीकवण्यासाठी हे पुस्तक सिंगापूर हून प्रिंट करुन आणलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close