S M L

उत्तरप्रदेशच्या राज्य मुख्य सचिवाला तुरुंगवास

07 डिसेंबरभ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्याच्या मुख्य सचिवाला तुरुंगात जावं लागण्याची घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्य सचिव नीरा यादव नोएडा जमीन घोटाळ्यात दोषी आढळल्यात. सीबीआयच्या विशेष कोर्टाने त्यांना भूखंड वाटप घोटाळ्यात दोषी धरलं आहे. त्यांच्यासोबत फ्लेक्स कंपनीचे सीईओ अशोक चतुर्देवी यांनाही दोषी धरण्यात आलं आहे. या दोघांना चार वर्षांची शिक्षा देण्यात आली. नीरा यादव 1995 मध्ये नोएडा ऑथॉरिटीच्या अध्यक्ष होत्या. त्यावेळी त्यांनी भूखंड वाटपात गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुलायम सिंह यादव आणि मायावती या दोघांशीही त्यांचे चांगले संबंध होते. त्या सध्या भाजपमध्ये आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2010 12:53 PM IST

उत्तरप्रदेशच्या राज्य मुख्य सचिवाला तुरुंगवास

07 डिसेंबर

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्याच्या मुख्य सचिवाला तुरुंगात जावं लागण्याची घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्य सचिव नीरा यादव नोएडा जमीन घोटाळ्यात दोषी आढळल्यात. सीबीआयच्या विशेष कोर्टाने त्यांना भूखंड वाटप घोटाळ्यात दोषी धरलं आहे. त्यांच्यासोबत फ्लेक्स कंपनीचे सीईओ अशोक चतुर्देवी यांनाही दोषी धरण्यात आलं आहे. या दोघांना चार वर्षांची शिक्षा देण्यात आली. नीरा यादव 1995 मध्ये नोएडा ऑथॉरिटीच्या अध्यक्ष होत्या. त्यावेळी त्यांनी भूखंड वाटपात गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुलायम सिंह यादव आणि मायावती या दोघांशीही त्यांचे चांगले संबंध होते. त्या सध्या भाजपमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2010 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close