S M L

वाराणसीत बॉम्बस्फोट ; देशभरात हायअलर्ट जारी

07 डिसेंबर उत्तरप्रदेशातल्या वाराणसीमध्ये गंगेच्या शितला माता घाटाजवळ आज संध्याकाळी साडे सहा वाजता बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात एका लहान मुलीचा जीव गेला असून चेंगराचेंगरीत 23 भाविक जखमी झाले. जखमींमध्ये एका विदेशी पर्यटकाचा समावेश आहे. गंगा आरती सुरु असतांना हा स्फोट झाला. या आरतीदरम्यान भाविकांची मोठी गर्दी असते. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहेत. घाटाकडे जाणार्‍या पायर्‍यावर स्फोटक ठेवण्यात आली होती. या स्फोटाची इंडियन मुजाहिदीनने हल्ल्याची जबबादारी स्वीकारली असून हा स्फोट म्हणजे बाबरी निकालाचा बदला असल्याचे पत्रात म्हटले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे गृहसचिव जी के पिल्लई यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या स्फोटानंतर मुंबईसह, दिल्ली, बंगलोर आणि हैदराबाद इथं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी लोकांना शांततेचे आवाहन केलं आहे. सोनिया गांधींनी या स्फोटाचा निषेध व्यक्त केला .

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2010 04:15 PM IST

वाराणसीत बॉम्बस्फोट ; देशभरात हायअलर्ट जारी

07 डिसेंबर

उत्तरप्रदेशातल्या वाराणसीमध्ये गंगेच्या शितला माता घाटाजवळ आज संध्याकाळी साडे सहा वाजता बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात एका लहान मुलीचा जीव गेला असून चेंगराचेंगरीत 23 भाविक जखमी झाले. जखमींमध्ये एका विदेशी पर्यटकाचा समावेश आहे. गंगा आरती सुरु असतांना हा स्फोट झाला. या आरतीदरम्यान भाविकांची मोठी गर्दी असते. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहेत. घाटाकडे जाणार्‍या पायर्‍यावर स्फोटक ठेवण्यात आली होती. या स्फोटाची इंडियन मुजाहिदीनने हल्ल्याची जबबादारी स्वीकारली असून हा स्फोट म्हणजे बाबरी निकालाचा बदला असल्याचे पत्रात म्हटले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे गृहसचिव जी के पिल्लई यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या स्फोटानंतर मुंबईसह, दिल्ली, बंगलोर आणि हैदराबाद इथं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी लोकांना शांततेचे आवाहन केलं आहे. सोनिया गांधींनी या स्फोटाचा निषेध व्यक्त केला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2010 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close