S M L

लवासा प्रकरणी पर्यावरण मंत्रालयात सुनावणी सुरु

09 डिसेंबरलवासा प्रकरणाची सुनावणी आज दिल्लीतल्या पर्यावरण मंत्रालयात झाली. लवासा शहर बांधत असताना आम्ही पर्यावरणाची काळजी घेत आहोत. असं यावेळी लवासाच्या अधिका-यांनी प्रझेंटेशनद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच बांधकामासाठी गरजेच्या असलेले सर्व परवाने लवासाने घेतले आहेत असंही यावेळी लवासा कॉर्पेरेशनने सांगितले. या बैठकील कोर्टाच्याच आदेशनुसार मेधा पाटकर आणि इतर लवासा विरोधी कार्यकर्तेही उपस्थित होते. या वेळी मेधा पाटकर यांनी लवासाची बाजू खोडून काढत लवासाने केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी घेणं गरजेचे होते असं सांगितले. आज सुनावणी पूर्ण झाली असून उद्या दोन्ही बाजुंकडून कागदपत्र मंत्रालयाला सादर केली जातील.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2010 02:54 PM IST

लवासा प्रकरणी पर्यावरण मंत्रालयात सुनावणी सुरु

09 डिसेंबर

लवासा प्रकरणाची सुनावणी आज दिल्लीतल्या पर्यावरण मंत्रालयात झाली. लवासा शहर बांधत असताना आम्ही पर्यावरणाची काळजी घेत आहोत. असं यावेळी लवासाच्या अधिका-यांनी प्रझेंटेशनद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच बांधकामासाठी गरजेच्या असलेले सर्व परवाने लवासाने घेतले आहेत असंही यावेळी लवासा कॉर्पेरेशनने सांगितले. या बैठकील कोर्टाच्याच आदेशनुसार मेधा पाटकर आणि इतर लवासा विरोधी कार्यकर्तेही उपस्थित होते. या वेळी मेधा पाटकर यांनी लवासाची बाजू खोडून काढत लवासाने केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी घेणं गरजेचे होते असं सांगितले. आज सुनावणी पूर्ण झाली असून उद्या दोन्ही बाजुंकडून कागदपत्र मंत्रालयाला सादर केली जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2010 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close