S M L

दिग्विजय सिंह यांचं वक्तव्य म्हणजे मूर्खपणाचा कळस - उद्धव ठाकरें

12 डिसेंबरकाँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दलचे वक्तव्य केल्यानंतर तीव्र पडसाद उमटत आहे. संजय निरुपम यांच्या सारवासारवीनंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सिंग यांच्या वक्तव्याविषयी संतप्त प्रतिक्रिया दिली. दिग्विजय सिंह यांचं शहीद हेमंत करकरेंबद्दलचं वक्तव्य म्हणजे मूर्खपणाचा कळस असल्याचं उद्धव यांनी म्हटलं आहे.वक्तव्याचा निषेध - मुंडे तर शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी निषेध केला आहे. पाकिस्तानला फायदा होईल अशी वक्तव्य काँग्रेस नेत्यांनी करु नये असं मुंडे म्हणाले. त्याबाबत मी ठाम आहे - दिग्विजय सिंहदरम्यान, मी जे बोललो होतो त्याबाबत मी ठाम आहे. करकरेंच्या मृत्यूला पाकिस्तान जबाबदार नाही असं कधीच म्हटलं नव्हतं असं स्पष्टीकरण दिग्विजय सिंह यांनी दिलं आहे. सिंह यांच्या वक्तव्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. करकरेंना हिंदुत्ववादी नेत्यांनी मारलं असंही मी म्हटलं नव्हतं असंही ते म्हणाले.शिवाय दिग्विजय सिंह यांनी संजय निरूपम यांना फोन करून त्यांचा गैरसमज दूर केला. पाकिस्तानी अतिरेक्यांना आपण कधीही क्लिन चीट दिलेली नाही असंही त्यांनी निरूपम यांना सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2010 12:08 PM IST

दिग्विजय सिंह यांचं वक्तव्य म्हणजे मूर्खपणाचा कळस - उद्धव ठाकरें

12 डिसेंबर

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दलचे वक्तव्य केल्यानंतर तीव्र पडसाद उमटत आहे. संजय निरुपम यांच्या सारवासारवीनंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सिंग यांच्या वक्तव्याविषयी संतप्त प्रतिक्रिया दिली. दिग्विजय सिंह यांचं शहीद हेमंत करकरेंबद्दलचं वक्तव्य म्हणजे मूर्खपणाचा कळस असल्याचं उद्धव यांनी म्हटलं आहे.

वक्तव्याचा निषेध - मुंडे

तर शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी निषेध केला आहे. पाकिस्तानला फायदा होईल अशी वक्तव्य काँग्रेस नेत्यांनी करु नये असं मुंडे म्हणाले.

त्याबाबत मी ठाम आहे - दिग्विजय सिंह

दरम्यान, मी जे बोललो होतो त्याबाबत मी ठाम आहे. करकरेंच्या मृत्यूला पाकिस्तान जबाबदार नाही असं कधीच म्हटलं नव्हतं असं स्पष्टीकरण दिग्विजय सिंह यांनी दिलं आहे. सिंह यांच्या वक्तव्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. करकरेंना हिंदुत्ववादी नेत्यांनी मारलं असंही मी म्हटलं नव्हतं असंही ते म्हणाले.शिवाय दिग्विजय सिंह यांनी संजय निरूपम यांना फोन करून त्यांचा गैरसमज दूर केला. पाकिस्तानी अतिरेक्यांना आपण कधीही क्लिन चीट दिलेली नाही असंही त्यांनी निरूपम यांना सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2010 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close