S M L

राज्य सरकारची भूमिका संकुचित नाही-मुख्यमंत्री

01 नोव्हेंबर-मुंबई,उत्तर भारतीयांबाबत राज्य सरकारची भूमिका संकुचित नाही, असा खुलासा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केला. राज ठाकरे यांच्या विरोधात ऐंशीहून अधिक केसेस् दाखल करण्यात आल्या आहेत. तसंच उत्तर भारतीयांना सर्व सुरक्षा पुरवण्यास राज्य सरकार वचनबद्ध आहे, असंही पत्रात नमूद करण्यात आलंय. गेल्या मंगळवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विलासराव देशमुख यांची पत्र पाठवून कान उघाडणी केली. राज ठाकरे आणि मनसेच्या विरोधात सक्तीने कारवाई होत नाही. तसंच ' बुलेट का जवाब बुलेटसे देंगे', हे आर. आर. पाटील यांचं वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे, ही जर का राज्य सरकारची भूमिका असेल तर त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे, असं पंतप्रधानांनी पत्रात म्हटलंय. पंतप्रधानांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी उत्तर दिलं. आयबीएन- लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या विरोधात ऐंशीहून अधिक केसेस् दाखल करण्यात आल्या असून, त्यांच्या पोलिसी पाठपुरावा करण्यात येतोय. तसंच आर. आर. पाटील यांचं वक्तव्य अतिशयोक्तीपूर्ण आहे, असंही पत्रात नमूद करण्यात आलंय. पण यामुळे सत्ताधारी आघाडीत आता नवाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2008 09:13 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2008 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close