S M L

मी स्वतःसुद्धा स्थलांतरीतच - चिदंबरम

13 डिसेंबरपुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा समोर आला आहे. पण यावेळी तो आणला केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी. दिल्लीतल्या वाढत्या गुन्हेगारीला परप्रांतीयच जबाबदार असल्याचं वादग्रस्त विधान चिदंबरम यांनी केलं. दिल्लीमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे. या परिस्थितीला दिल्लीच्या बाहेरून आलेले लोक जबाबदार आहेत असं चिदंबरम म्हणाले. दिल्लीत अनधिकृत वस्त्या वाढल्याचं त्यांनी सांगितलं. चिदंबरम यांच्या वादग्रस्त विधानावर देशभर प्रतिक्रिया उमटल्या पोलिसांचे अपयश झाकण्यासाठी चिदंबरम यांनी या प्रकारचे विधान केल्याचा आरोप होतो. सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी या विधानाचा कडक शब्दात निषेध केला. या बद्दल चिदंमबरम् यांनी सारवासारव करत या बद्दल स्पष्टीकरण दिलं. त्यांनी म्हटलं की, 'स्थलांतरीत हा शब्द मी एखादं राज्य, धर्म किंवा भाषेला उद्देशून वापरला नाही. दिल्लीत कोणत्याही कामासाठी येणारी व्यक्ती स्थलांतरीतच असते. मी स्वतःसुद्धा स्थलांतरीतच आहे. काही लोकांनी स्थलांतरीत या शब्दावरून विनाकारण वाद निर्माण केला. मला म्हणायचं होतं, की कुणाची बेशिस्त वागणूक खपवून घेतली जाणार नाही.'

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2010 11:01 AM IST

मी स्वतःसुद्धा स्थलांतरीतच - चिदंबरम

13 डिसेंबर

पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा समोर आला आहे. पण यावेळी तो आणला केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी. दिल्लीतल्या वाढत्या गुन्हेगारीला परप्रांतीयच जबाबदार असल्याचं वादग्रस्त विधान चिदंबरम यांनी केलं. दिल्लीमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे. या परिस्थितीला दिल्लीच्या बाहेरून आलेले लोक जबाबदार आहेत असं चिदंबरम म्हणाले. दिल्लीत अनधिकृत वस्त्या वाढल्याचं त्यांनी सांगितलं.

चिदंबरम यांच्या वादग्रस्त विधानावर देशभर प्रतिक्रिया उमटल्या पोलिसांचे अपयश झाकण्यासाठी चिदंबरम यांनी या प्रकारचे विधान केल्याचा आरोप होतो. सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी या विधानाचा कडक शब्दात निषेध केला. या बद्दल चिदंमबरम् यांनी सारवासारव करत या बद्दल स्पष्टीकरण दिलं. त्यांनी म्हटलं की, 'स्थलांतरीत हा शब्द मी एखादं राज्य, धर्म किंवा भाषेला उद्देशून वापरला नाही. दिल्लीत कोणत्याही कामासाठी येणारी व्यक्ती स्थलांतरीतच असते. मी स्वतःसुद्धा स्थलांतरीतच आहे. काही लोकांनी स्थलांतरीत या शब्दावरून विनाकारण वाद निर्माण केला. मला म्हणायचं होतं, की कुणाची बेशिस्त वागणूक खपवून घेतली जाणार नाही.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2010 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close