S M L

मुंबई महानगरपालिकेनं ताळेबंदच दिला नाही - मुख्यमंत्री

14 डिसेंबरगेल्या 3 वर्षात मुंबई महानगरपालिकेनं ताळेबंद म्हणजे आपला ऑडिट रिपोर्ट सादर केलेला नाही असा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केला. मुंबईच्या समस्यांची आज चर्चा झाली. आणि त्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यानी ही माहिती दिली. 2006 ते 2007 ला ताळेबंद मुंबई महानगरपालिकेनं सादर केला. पण त्यानंतर ताळेबंद मांडलाच नाही. तो मांडला तर अनेक आर्थिक अपहार उजेडात येण्याची शक्यता आहे असही मुख्यमंत्री आज म्हणाले. त्याचबरोबर महापालिकेचा 2007-2008 चा ताळेबंद येत्या 2 महिन्यात सादर झालाच पाहिजे असा आदेशही मुख्यमंत्र्यानी चर्चेदरम्यान दिला. मुंबईला जेवढी मोकळी मैदाने आणि पार्कआवश्यक आहेत त्यापेक्षा फक्त 20 टक्केच जागा उपलब्ध आहे. स्थानिक नागरिक किंवा त्यांच्या सहकारी संस्थांना मैदानाची निगा राखू द्यावी. मात्र ते होत नाही. आम्ही सविस्तर माहिती मागवली आहे. असंही मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केलं. वेगळ्या कामांना देण्यात आलेल्या निधीमुऴे मोठ्या प्रमाणात फेरफार झाले. यात अनेक गैरप्रकार होऊ शकतात त्याची चौकशी करु असही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांची मुंबई एक्स्प्रेस - तीन वर्षांत मुंबई महानगरपालिकेनं ताळेबंदच सादर केलेला नाही- ताळेबंद मांडल्यावर अनेक आर्थिक अपहार उजेडात येण्याची शक्यता- 2007 - 08 चा ताळेबंद येत्या 2 महिन्यात सादर झालाच पाहिजे- आवश्यकतेपेक्षा केवळ 20 टक्केच मोकळी मैदान उपलब्ध- स्थानिक नागरिक किंवा सहकारी संस्थांना मैदानांची निगा राखण्याची परवानगी हवी- विकासकामांना देण्यात आलेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार- सर्व प्रकारच्या गैरप्रकारांची चौकशी करणार

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 09:39 AM IST

मुंबई महानगरपालिकेनं ताळेबंदच दिला नाही - मुख्यमंत्री

14 डिसेंबर

गेल्या 3 वर्षात मुंबई महानगरपालिकेनं ताळेबंद म्हणजे आपला ऑडिट रिपोर्ट सादर केलेला नाही असा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केला. मुंबईच्या समस्यांची आज चर्चा झाली. आणि त्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यानी ही माहिती दिली. 2006 ते 2007 ला ताळेबंद मुंबई महानगरपालिकेनं सादर केला. पण त्यानंतर ताळेबंद मांडलाच नाही. तो मांडला तर अनेक आर्थिक अपहार उजेडात येण्याची शक्यता आहे असही मुख्यमंत्री आज म्हणाले. त्याचबरोबर महापालिकेचा 2007-2008 चा ताळेबंद येत्या 2 महिन्यात सादर झालाच पाहिजे असा आदेशही मुख्यमंत्र्यानी चर्चेदरम्यान दिला.

मुंबईला जेवढी मोकळी मैदाने आणि पार्कआवश्यक आहेत त्यापेक्षा फक्त 20 टक्केच जागा उपलब्ध आहे. स्थानिक नागरिक किंवा त्यांच्या सहकारी संस्थांना मैदानाची निगा राखू द्यावी. मात्र ते होत नाही. आम्ही सविस्तर माहिती मागवली आहे. असंही मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केलं. वेगळ्या कामांना देण्यात आलेल्या निधीमुऴे मोठ्या प्रमाणात फेरफार झाले. यात अनेक गैरप्रकार होऊ शकतात त्याची चौकशी करु असही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांची मुंबई एक्स्प्रेस

- तीन वर्षांत मुंबई महानगरपालिकेनं ताळेबंदच सादर केलेला नाही- ताळेबंद मांडल्यावर अनेक आर्थिक अपहार उजेडात येण्याची शक्यता- 2007 - 08 चा ताळेबंद येत्या 2 महिन्यात सादर झालाच पाहिजे- आवश्यकतेपेक्षा केवळ 20 टक्केच मोकळी मैदान उपलब्ध- स्थानिक नागरिक किंवा सहकारी संस्थांना मैदानांची निगा राखण्याची परवानगी हवी- विकासकामांना देण्यात आलेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार- सर्व प्रकारच्या गैरप्रकारांची चौकशी करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close