S M L

गेट वे ऑफ इंडिया येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुरूस्तीला सुरुवात

14 डिसेंबरगेट वे ऑफ इंडिया इथं असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेची बातमी आयबीएन लोकमतने काही दिवसांपूर्वी दाखवली होती. आयबीएन लोकमतच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर महानगरपालिकेला जाग आली. या पुतळ्याच्या दुरूस्तीचे आणि या सुशोभिकरणाच्या कामाचे काँट्रक्ट आता महानगरपालिकेने दिलं आहे. येत्या 3 महिन्यात हे काम पूर्ण केलं जाईल अशी माहिती महापौरांनी दिली. सोमवारी त्यांनी या पुतळ्याची पाहणी केली. पण या पुतळ्याच्या दुरूस्तीला उशीर झाला असल्याची कबुली महापौर श्रद्धा जाधव यांनी दिली. तसेच या पुतळ्याच्या दुरुस्तीसंदर्भात बीएमसी प्रशासनाला तातडीने काम सुरु करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेतमुंबईतल्या गेट वेऑफ इंडिया इथला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा संयुक्त महाराष्ट्राचे पहिले आणि एकमेव स्मारक आहे. या पुतळ्याला येत्या 26 जानेवारी रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहे. या स्मारकाचा हा सुवर्ण महोत्सव साजरा करावा असं मत आंतरराष्ट्र्‌ीय किर्तीचे शिल्पकार भाऊ साठे यांनी व्यक्त केलं. हा पुतळा साठे यांनीच तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीवरुन अवघ्या सहा महिन्यात उभारला होता. या ऐतिहासिक पुतळ्याच्या दुर वस्थेसंदर्भात सर्वप्रथम आयबीएन लोकमतने आवाज उठवला होता. त्यानंतर या पुतळ्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 11:25 AM IST

गेट वे ऑफ इंडिया येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुरूस्तीला सुरुवात

14 डिसेंबर

गेट वे ऑफ इंडिया इथं असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेची बातमी आयबीएन लोकमतने काही दिवसांपूर्वी दाखवली होती. आयबीएन लोकमतच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर महानगरपालिकेला जाग आली. या पुतळ्याच्या दुरूस्तीचे आणि या सुशोभिकरणाच्या कामाचे काँट्रक्ट आता महानगरपालिकेने दिलं आहे. येत्या 3 महिन्यात हे काम पूर्ण केलं जाईल अशी माहिती महापौरांनी दिली. सोमवारी त्यांनी या पुतळ्याची पाहणी केली. पण या पुतळ्याच्या दुरूस्तीला उशीर झाला असल्याची कबुली महापौर श्रद्धा जाधव यांनी दिली. तसेच या पुतळ्याच्या दुरुस्तीसंदर्भात बीएमसी प्रशासनाला तातडीने काम सुरु करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत

मुंबईतल्या गेट वेऑफ इंडिया इथला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा संयुक्त महाराष्ट्राचे पहिले आणि एकमेव स्मारक आहे. या पुतळ्याला येत्या 26 जानेवारी रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहे. या स्मारकाचा हा सुवर्ण महोत्सव साजरा करावा असं मत आंतरराष्ट्र्‌ीय किर्तीचे शिल्पकार भाऊ साठे यांनी व्यक्त केलं. हा पुतळा साठे यांनीच तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीवरुन अवघ्या सहा महिन्यात उभारला होता. या ऐतिहासिक पुतळ्याच्या दुर वस्थेसंदर्भात सर्वप्रथम आयबीएन लोकमतने आवाज उठवला होता. त्यानंतर या पुतळ्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close