S M L

अयोध्याप्रकरणी सुन्नी वक्फ बोर्डाची सुप्रीम कोर्टात धाव

14 डिसेंबरअयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीच्या मुद्द्यावर सुन्नी वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाच्या निर्णयाविरोधात सुन्नी वक्फ बोर्डाने याचिका दाखल केली. अयोध्येतल्या वादग्रस्त जागेचे तीन भाग करण्याचा निर्णय लखनौ खंडपीठाने दिला होता. एक भाग सुन्नी वक्फ बोर्ड, दुसरा भाग राम लल्ला आणि तिसरा भाग निर्मोही आखाडा अशी ही विभागणी आहे. पण कोर्टाचा हा निर्णय श्रद्धेवर अवलंबून आहे, त्याला कायदेशीर पुराव्यांचा आधार नाही असं वक्फ बोर्डाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. याबाबत आणखी नऊ याचिका दाखल करणार असल्याचे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 05:16 PM IST

अयोध्याप्रकरणी सुन्नी वक्फ बोर्डाची सुप्रीम कोर्टात धाव

14 डिसेंबर

अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीच्या मुद्द्यावर सुन्नी वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाच्या निर्णयाविरोधात सुन्नी वक्फ बोर्डाने याचिका दाखल केली. अयोध्येतल्या वादग्रस्त जागेचे तीन भाग करण्याचा निर्णय लखनौ खंडपीठाने दिला होता. एक भाग सुन्नी वक्फ बोर्ड, दुसरा भाग राम लल्ला आणि तिसरा भाग निर्मोही आखाडा अशी ही विभागणी आहे. पण कोर्टाचा हा निर्णय श्रद्धेवर अवलंबून आहे, त्याला कायदेशीर पुराव्यांचा आधार नाही असं वक्फ बोर्डाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. याबाबत आणखी नऊ याचिका दाखल करणार असल्याचे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close