S M L

स्पेक्ट्रम प्रकरणी सीबीआयची धडक मोहीम सुरु

15 डिसेंबरटू जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं आज तामीळनाडू आणि दिल्लीत 34 ठिकाणी छापे टाकले आहेत. लॉबीस्ट नीरा राडिया आणि ट्रायचे माजी सचिव प्रदीप बैजल यांच्या घरी आणि ऑफिसवर छापे टाकण्यात आले आहे. नीरा राडिया हिच्या छत्तरपूर इथल्या सुदेश फार्महाऊस आणि मालछा मार्ग, गोपाल दास भवन इथल्या ऑफिसवर छापे टाकण्यात आले. तर बैजल यांच्या नोएडा इथल्या घरावर छापा टाकण्यात आला आहेत. महेश जैनच्या घरावरही छापे टाकण्यात आले. महेश जैन हा हवाला दलाल असून ए राजा यांच्या डायरीत त्याचं नाव होतं. महत्वाची कागदपत्र गोळा करण्यासाठी हे छापे टाकण्यात आले. ए राजा यांचे चार्टंड अकाउन्ट यांच्या चेन्नईच्या घरावर आणि तामीळ मॅगझीनच्या एका पत्रकाराच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2010 09:07 AM IST

स्पेक्ट्रम प्रकरणी सीबीआयची धडक मोहीम सुरु

15 डिसेंबर

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं आज तामीळनाडू आणि दिल्लीत 34 ठिकाणी छापे टाकले आहेत. लॉबीस्ट नीरा राडिया आणि ट्रायचे माजी सचिव प्रदीप बैजल यांच्या घरी आणि ऑफिसवर छापे टाकण्यात आले आहे. नीरा राडिया हिच्या छत्तरपूर इथल्या सुदेश फार्महाऊस आणि मालछा मार्ग, गोपाल दास भवन इथल्या ऑफिसवर छापे टाकण्यात आले. तर बैजल यांच्या नोएडा इथल्या घरावर छापा टाकण्यात आला आहेत. महेश जैनच्या घरावरही छापे टाकण्यात आले. महेश जैन हा हवाला दलाल असून ए राजा यांच्या डायरीत त्याचं नाव होतं. महत्वाची कागदपत्र गोळा करण्यासाठी हे छापे टाकण्यात आले. ए राजा यांचे चार्टंड अकाउन्ट यांच्या चेन्नईच्या घरावर आणि तामीळ मॅगझीनच्या एका पत्रकाराच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2010 09:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close