S M L

सावकारी प्रकरणावरुन विधानसभेत विरोधकांचा गदारोळ

15 डिसेंबरबुलढाणा जिल्ह्यातील सावकारी प्रकरणात हस्तक्षेप केल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं होतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना खामगावचे काँगे्रस आमदार दिलीप सानंदा आणि त्यांच्या नातेवाईकांना एका सावकारी प्रकरणातून वाचवण्यासाठी देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता. तर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी राज्य सरकारला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला.हा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. या मुद्द्यावरुन विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. सरकारने या प्रकरणी माहिती द्यावी या मागणीवरुन विरोधकांनी घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सरकारने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी. राज्य सरकार गुन्हेगाराना संरक्षण देण्याच काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2010 11:29 AM IST

सावकारी प्रकरणावरुन विधानसभेत विरोधकांचा गदारोळ

15 डिसेंबर

बुलढाणा जिल्ह्यातील सावकारी प्रकरणात हस्तक्षेप केल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं होतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना खामगावचे काँगे्रस आमदार दिलीप सानंदा आणि त्यांच्या नातेवाईकांना एका सावकारी प्रकरणातून वाचवण्यासाठी देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता. तर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी राज्य सरकारला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

हा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. या मुद्द्यावरुन विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. सरकारने या प्रकरणी माहिती द्यावी या मागणीवरुन विरोधकांनी घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सरकारने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी. राज्य सरकार गुन्हेगाराना संरक्षण देण्याच काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2010 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close