S M L

महाराष्ट्राची लावणी झाली ग्लोबल

15 डिसेंबरमहाराष्ट्राची लावणी झाली ग्लोबल, चीन, जपान, रशिया आणि इंडोनेशियातल्या कलाकारांना घेतले लावणीचे प्रशिक्षण पारंपारिक लावणी कलाकार राजश्री नगरकर आणि त्यांच्या कालीका कला केंद्राने लावणीला सातासमुद्रापार पोहोचवलं. जपान, रशिया आणि इंडोनेशिया या ठिकाणी जाऊन या कलाकारांनी लावणी फक्त सादरच केली नाही तर त्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण शिबीर घेऊन तीथल्या कालाकारांना, विद्यार्थ्यांना या लावणीचे धडे दिले. भारतीय रसीकां इतकाच प्रतीसाद या कलाकारांना भरताबाहेरही आला. भारत सरकारच्या आयसीसीए विभागतर्फे या केंद्राची निवड केली होती. संगीत आणि कलेला भाषेचा अडथळा येत नाही हेच या प्रतीसादावरुन दिसुन येतं.ढोलकीचे बोल आणि घुंगराचा ताल. याच आवाजावर थिरकणारी पावलं. शिटी वाजवून ताल धरणारे आणि दाद देणारे प्रेक्षक हे दृश्य महाराष्ट्रातलं नाहीतर परदेशातलं आहे. अहमदनगरच्या राजश्री नगरकर आणि त्यांच्या टीमने जपान, रशिया आणि इंडोनेशिया अशा तीन देशांत जाऊन लावणी सादर केली. ती नुसतीच सादर केली नाही तर तिथल्या कलाकारांना लावणीचं प्रशिक्षणही दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2010 04:53 PM IST

महाराष्ट्राची लावणी झाली ग्लोबल

15 डिसेंबर

महाराष्ट्राची लावणी झाली ग्लोबल, चीन, जपान, रशिया आणि इंडोनेशियातल्या कलाकारांना घेतले लावणीचे प्रशिक्षण पारंपारिक लावणी कलाकार राजश्री नगरकर आणि त्यांच्या कालीका कला केंद्राने लावणीला सातासमुद्रापार पोहोचवलं. जपान, रशिया आणि इंडोनेशिया या ठिकाणी जाऊन या कलाकारांनी लावणी फक्त सादरच केली नाही तर त्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण शिबीर घेऊन तीथल्या कालाकारांना, विद्यार्थ्यांना या लावणीचे धडे दिले. भारतीय रसीकां इतकाच प्रतीसाद या कलाकारांना भरताबाहेरही आला. भारत सरकारच्या आयसीसीए विभागतर्फे या केंद्राची निवड केली होती. संगीत आणि कलेला भाषेचा अडथळा येत नाही हेच या प्रतीसादावरुन दिसुन येतं.

ढोलकीचे बोल आणि घुंगराचा ताल. याच आवाजावर थिरकणारी पावलं. शिटी वाजवून ताल धरणारे आणि दाद देणारे प्रेक्षक हे दृश्य महाराष्ट्रातलं नाहीतर परदेशातलं आहे. अहमदनगरच्या राजश्री नगरकर आणि त्यांच्या टीमने जपान, रशिया आणि इंडोनेशिया अशा तीन देशांत जाऊन लावणी सादर केली. ती नुसतीच सादर केली नाही तर तिथल्या कलाकारांना लावणीचं प्रशिक्षणही दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2010 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close