S M L

टेंभलीवर उधारीचा भार

16 डिसेंबरआधार कार्डाच्या निमित्ताने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी टेंभलीला भेट दिली. त्यांच्या या दौर्‍यावर लाखो रूपये खर्च झाले. मात्र या दौर्‍यात ज्यांनी कामं केली त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. आधार कार्ड योजनेचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावातून झाला. अजूनही आधार कार्डचे वाटप या गावात सुरु आहे. पंतप्रधानांच्या दौ -याच्या पार्श्वभुमीवर या गावात रस्ते तयार झाले जवळच्या शहादे शहरात रस्त्यांची डागडुजीही करण्यात आली.पण ठेकेदारांना या कामाचा मोबदला अजूनही मिळालेला नाही.पंतप्रधानांच्या दौर्‍यामध्ये शहाद्यामधील वातानुकुलित हॉटेलमध्ये प्रमुख अतिथींची सरबराई करण्यात आली होती. पण हॉटेलमालकांना त्याचे बिल अजूनही मिळालेले नाही.इतकंच नाही. तर दौर्‍याचे फोटो काढणार्‍या फोटोग्राफरचे पैसेही दिलेले नाहीत. याबद्दल जिल्हाधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमे-यासमोर माहिती द्यायला नकार दिला.एकूणच पंतप्रधान आले आणि गेले. टेंभली यानिमित्ताने देशाच्या नकाशावर आले. पण हा दौ-सगळा उधार उसनवारीच झाल्याची बाब पुढे आली आहे. आता ही रक्कम मिळण्यासाठी किती हेलपाटे मारावे लागतील हाच यां सामान्यांचा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2010 02:46 PM IST

टेंभलीवर उधारीचा भार

16 डिसेंबर

आधार कार्डाच्या निमित्ताने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी टेंभलीला भेट दिली. त्यांच्या या दौर्‍यावर लाखो रूपये खर्च झाले. मात्र या दौर्‍यात ज्यांनी कामं केली त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत.

आधार कार्ड योजनेचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावातून झाला. अजूनही आधार कार्डचे वाटप या गावात सुरु आहे. पंतप्रधानांच्या दौ -याच्या पार्श्वभुमीवर या गावात रस्ते तयार झाले जवळच्या शहादे शहरात रस्त्यांची डागडुजीही करण्यात आली.पण ठेकेदारांना या कामाचा मोबदला अजूनही मिळालेला नाही.

पंतप्रधानांच्या दौर्‍यामध्ये शहाद्यामधील वातानुकुलित हॉटेलमध्ये प्रमुख अतिथींची सरबराई करण्यात आली होती. पण हॉटेलमालकांना त्याचे बिल अजूनही मिळालेले नाही.इतकंच नाही. तर दौर्‍याचे फोटो काढणार्‍या फोटोग्राफरचे पैसेही दिलेले नाहीत. याबद्दल जिल्हाधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमे-यासमोर माहिती द्यायला नकार दिला.

एकूणच पंतप्रधान आले आणि गेले. टेंभली यानिमित्ताने देशाच्या नकाशावर आले. पण हा दौ-सगळा उधार उसनवारीच झाल्याची बाब पुढे आली आहे. आता ही रक्कम मिळण्यासाठी किती हेलपाटे मारावे लागतील हाच यां सामान्यांचा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2010 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close