S M L

देशाला हिंदू कट्टरपंथीयांचा धोका जास्त - राहूल गांधी

17 डिसेंबरविकिलिक्सनी आता आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. हा गौप्यस्फोट आहे राहुल गांधींबाबत. विकिलिक्सनं अमेरिकेचे राजदूत टिमोथी रोमर आणि राहुल गांधी यांच्यातले संभाषण उघड केलं. मुस्लीम दहशतवाद्यांपेक्षा, हिंदू कट्टरपंथीयांपासून देशाला जास्त धोका असल्याचं राहुल गांधी यांनी अमेरिकी राजदूताला म्हणाले आहे. विकिलिक्सनं आज त्यांच्या वेबसाईटवर दिल्लीहून वॉशिंग्टन डिसीला पाठवण्यात आलेली. 4 हजार गोपनीय कागदपत्रं उघडकीला आणली. पण आजच्या खुलाशामुळे पुन्हा एकदा काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिग्विजय सिंग यांच्या हेमंत करकरेंवरील वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद संपायच्या अगोदरच आता नवा वाद निर्माण होण्याची आणि काँग्रेसला भोवण्याची चिन्हं आहेत. राहुल गांधी म्हणतात..."लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांना भारतीय मुस्लीम समाजातल्या काही लोकांचा पाठिंबा आहे. याचा पुरावा आहे. पण अतिरेकी हिंदू संघटनांची वाढ हा त्याहीपेक्षा मोठा धोका आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये धार्मिक आणि राजकीय तणाव निर्माण होतो. पाकिस्तानातून भारतात होणार्‍या दहशतवादी कारवायांना प्रतिक्रिया म्हणून भारतात जन्मलेल्या या अतिरेकी संघटना हा जास्त काळजीचा विषय आहे आणि त्याकडे सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे." असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांचं स्पष्टीकरणविकिलिक्सच्या गौप्यस्फोटानंतर आपल्या दहशतवादासंबंधीच्या मताबाबात राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं. कोणत्याही स्वरुपाचा दहशतवाद हा भारतासाठी धोकादायकच आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्यांबाबत आपण दक्ष राहणं गरजेचं आहे असही राहुल गांधी यांनी म्हटलं. विकिलिक्सच्या गौप्यस्फोटानंतर राहुल गांधींच हे स्पष्टीकरण काँगे्रसकडून अधिकृतरित्या देण्यात आलं. राहुल गांधींनी माफी मागावी भाजपची मागणीदरम्यान, राहुल गांधींच्या या वक्तव्यावर तीव्र पडसाद उमटले आहे. विरोधी पक्षांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला. हे वक्तव्य अत्यंत दुदैर्वी असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी दिली. तर या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणीही भाजपने केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2010 09:25 AM IST

देशाला हिंदू कट्टरपंथीयांचा धोका जास्त - राहूल गांधी

17 डिसेंबर

विकिलिक्सनी आता आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. हा गौप्यस्फोट आहे राहुल गांधींबाबत. विकिलिक्सनं अमेरिकेचे राजदूत टिमोथी रोमर आणि राहुल गांधी यांच्यातले संभाषण उघड केलं. मुस्लीम दहशतवाद्यांपेक्षा, हिंदू कट्टरपंथीयांपासून देशाला जास्त धोका असल्याचं राहुल गांधी यांनी अमेरिकी राजदूताला म्हणाले आहे. विकिलिक्सनं आज त्यांच्या वेबसाईटवर दिल्लीहून वॉशिंग्टन डिसीला पाठवण्यात आलेली. 4 हजार गोपनीय कागदपत्रं उघडकीला आणली. पण आजच्या खुलाशामुळे पुन्हा एकदा काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिग्विजय सिंग यांच्या हेमंत करकरेंवरील वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद संपायच्या अगोदरच आता नवा वाद निर्माण होण्याची आणि काँग्रेसला भोवण्याची चिन्हं आहेत.

राहुल गांधी म्हणतात...

"लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांना भारतीय मुस्लीम समाजातल्या काही लोकांचा पाठिंबा आहे. याचा पुरावा आहे. पण अतिरेकी हिंदू संघटनांची वाढ हा त्याहीपेक्षा मोठा धोका आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये धार्मिक आणि राजकीय तणाव निर्माण होतो. पाकिस्तानातून भारतात होणार्‍या दहशतवादी कारवायांना प्रतिक्रिया म्हणून भारतात जन्मलेल्या या अतिरेकी संघटना हा जास्त काळजीचा विषय आहे आणि त्याकडे सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे." असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांचं स्पष्टीकरण

विकिलिक्सच्या गौप्यस्फोटानंतर आपल्या दहशतवादासंबंधीच्या मताबाबात राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं. कोणत्याही स्वरुपाचा दहशतवाद हा भारतासाठी धोकादायकच आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्यांबाबत आपण दक्ष राहणं गरजेचं आहे असही राहुल गांधी यांनी म्हटलं. विकिलिक्सच्या गौप्यस्फोटानंतर राहुल गांधींच हे स्पष्टीकरण काँगे्रसकडून अधिकृतरित्या देण्यात आलं.

राहुल गांधींनी माफी मागावी भाजपची मागणी

दरम्यान, राहुल गांधींच्या या वक्तव्यावर तीव्र पडसाद उमटले आहे. विरोधी पक्षांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला. हे वक्तव्य अत्यंत दुदैर्वी असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी दिली. तर या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणीही भाजपने केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2010 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close