S M L

माझ्या सिनेमातल्या पात्राकडे विचारपूर्वक पाहातो - दिग्दर्शक ओनीर

1 नोव्हेंबर, मुंबई -प्रिया हिंगरोनी'माय ब्रदर निखिल' आणि 'बस एक पल' या दोन सिनेमांचा दिग्दर्शक ओनीर गुंतला आहे 'सॉरी भाई' या त्याच्या नव्या सिनेमात. हा सिनेमा एक रोमॅन्टिक कॉमेडी असून आपल्या होणा-या भावोजींच्या प्रेमात पडणा-या एका तरुणीवर हा सिनेमा आधारला आहे. सिनेमाचं हे कथासूत्र भारतीय प्रेक्षकांच्या पचनी पडणं जरा कठीण वाटत असलं तरी ओनीर मात्र त्याच्या नवीन सिनेमाविषयी कॉन्फिडण्ट वाटत आहे.'माय ब्रदर निखिल' आणि 'बस एक पल'मध्ये जे नातेसंबध पहायला मिळाले ते देशात सर्वमान्य होते. पण या सिनेमातल्या नात्यांविषयी लोक बोलायला फारसे तयार नसतात. अशावेळेला या नात्याला सिनेमात कशाप्रकारे दाखवलं जातं हे महत्त्वाचं ठरतं. मी माझ्या सिनेमातल्या कॅरेक्टर्सना प्रेमाने आणि विचारपूर्वक पहातो प्रेक्षकही असेच पहातील असं मला वाटतं,' ओनीर बोलण्याच्या नादात जे काही बोलला त्याबद्दल तो कॉन्फीडण्ट वाटला. त्याचा कॉमेडीचा अनुभव जरी पहिलाच असला तरी अजूनही ओनीरच्या दिग्दर्शनात कोणताही फरक जाणवला नाही. तो सांगतो, 'कलाकाराच्या एका शॉटनंतर वाह वाह काय शॉट आहे असं ओरडताना मी अनेकांना पाहिलं आहे. पण जर मी असा प्रत्येक शॉटमागे ओरडायला लागलो तर नंतर ते खोटं वाटायला लागेल. तसंही सिनेमातले कलाकार इतके चांगले आहेत की, मला वाटतं त्यांना त्यांच्या हुशारीबद्दल सारखं सारखं सांगावं लागू नये,'आपला नवा सिनेमा रिलिज होत आहे याचं ओनीरला बिल्कुल टेन्शन नाही आहे. तो म्हणतो, 'माझ्याकडून अपेक्षा ठेवाव्यात इतके प्रेक्षक मला नक्कीच ओळखत नाहीत. पण मला विश्वास आहे की, या सिनेमातल्या कलाकारांना पाहिल्यानंतर ते नक्कीच या सिनेमाकडून भरपूर अपेक्षा ठेवतील.' संजय सुरी, शर्मन जोशी, बोमन इराणी आणि शबाना आझ्मी ही स्टारकास्ट या सिनेमात पहायला मिळणार आहेत. चित्रगंधा सिंग हिच्यासाठी हा सिनेमा म्हणजे तिचा कमबॅक असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2008 10:46 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2008 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close