S M L

विलासरावांची खुर्ची धोक्यात?

आशिष दीक्षित, नवी दिल्ली17 डिसेंबरसुप्रीम कोर्टाच्या ताशेर्‍यानंतरही केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला स्पष्ट शब्दात नकारदिला. विदर्भातल्या सावकारांना पाठिशी घातल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने विलासरावांवर ताशेरे ओढल्यामुळे विरोधकांनी गेले दोन दिवस विधानसभेत गदारोळ करत विलासरावांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.विरोधकांच्या मागणीनुसार मी राजीनामा देणार नाही असं विलासराव देशमुखांनी ठणकावून सांगितलं. दिलापकुमार सानंदा या आपल्या समर्थक आमदाराला वाचवण्यासाठी विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री असताना पोलिसांना फोन केला आणि शेतकर्‍यांना त्रास देणार्‍या सावकाराविरुद्ध केस नोंदवू दिली नाही. याप्रकाराची गंभीर दखल आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आणि आता सुप्रीम कोर्टाने घेतली. न्यायमूर्ती जी एस सिंघवी आणि ए के गांगुली यांच्या खंडपीठाने विलासरावांच्या या कृत्यासाठी राज्य सरकारला दहा लाखांचा दंड ठोठावला. न्यायमूर्ती अतिशय कडक भाषेत आपल्या आदेशात म्हणतात..आम्हाला आढळले आहे की सत्ताधारी पक्षाच्या एका सावकाराला वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणेच्या कामात मोठी ढवळाढवळ करण्यात आली. राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारी न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करायला नको होता.कोर्टाच्या या आदेशाचे जोरदार पडसाद नागपुरात गुरुवारी संपलेल्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. शेतकर्‍यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणार्‍या विलासरावांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना आणि भाजपने केली. तर विलासरावांच्या कृत्यावर सरकारने निवेदन करावे आणि पैसे त्यांच्याकडून वसूल करावेत अशी मागणी मनसेने केली. कोर्टाचा निकाल येऊन तीन दिवस झाले. तरीही आपल्याला निकालपत्रचं मिळालं नाही असा दावा विलासराव करत आहेत. आणि मीडियापासून पळ काढताहेत. त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी मात्र विलासराव सुप्रीम कोर्टात रिव्हिव्ह पिटीशन दाखल करु शकतात असे संकेत दिले.केंद्रातलं सरकार, विरोधक आणि दिल्लीतील मीडिया यांचे सर्व लक्ष सध्या टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावर असल्याने विलासरावांना थोडा दिलासा मिळाला. पण भ्रष्टाचाराचे केवळ आरोप झाल्यानंतर अशोक चव्हाणांचा राजीनामा घेणार्‍या सोनिया गांधी सुप्रीम कोर्टाकडून दोषी सिद्ध झालेल्या विलासरावांना किती काळ पाठिशी घालतील हाच खरा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2010 12:23 PM IST

विलासरावांची खुर्ची  धोक्यात?

आशिष दीक्षित, नवी दिल्ली

17 डिसेंबर

सुप्रीम कोर्टाच्या ताशेर्‍यानंतरही केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला स्पष्ट शब्दात नकारदिला. विदर्भातल्या सावकारांना पाठिशी घातल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने विलासरावांवर ताशेरे ओढल्यामुळे विरोधकांनी गेले दोन दिवस विधानसभेत गदारोळ करत विलासरावांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

विरोधकांच्या मागणीनुसार मी राजीनामा देणार नाही असं विलासराव देशमुखांनी ठणकावून सांगितलं. दिलापकुमार सानंदा या आपल्या समर्थक आमदाराला वाचवण्यासाठी विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री असताना पोलिसांना फोन केला आणि शेतकर्‍यांना त्रास देणार्‍या सावकाराविरुद्ध केस नोंदवू दिली नाही. याप्रकाराची गंभीर दखल आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आणि आता सुप्रीम कोर्टाने घेतली. न्यायमूर्ती जी एस सिंघवी आणि ए के गांगुली यांच्या खंडपीठाने विलासरावांच्या या कृत्यासाठी राज्य सरकारला दहा लाखांचा दंड ठोठावला.

न्यायमूर्ती अतिशय कडक भाषेत आपल्या आदेशात म्हणतात..

आम्हाला आढळले आहे की सत्ताधारी पक्षाच्या एका सावकाराला वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणेच्या कामात मोठी ढवळाढवळ करण्यात आली. राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारी न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करायला नको होता.

कोर्टाच्या या आदेशाचे जोरदार पडसाद नागपुरात गुरुवारी संपलेल्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. शेतकर्‍यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणार्‍या विलासरावांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना आणि भाजपने केली. तर विलासरावांच्या कृत्यावर सरकारने निवेदन करावे आणि पैसे त्यांच्याकडून वसूल करावेत अशी मागणी मनसेने केली.

कोर्टाचा निकाल येऊन तीन दिवस झाले. तरीही आपल्याला निकालपत्रचं मिळालं नाही असा दावा विलासराव करत आहेत. आणि मीडियापासून पळ काढताहेत. त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी मात्र विलासराव सुप्रीम कोर्टात रिव्हिव्ह पिटीशन दाखल करु शकतात असे संकेत दिले.

केंद्रातलं सरकार, विरोधक आणि दिल्लीतील मीडिया यांचे सर्व लक्ष सध्या टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावर असल्याने विलासरावांना थोडा दिलासा मिळाला. पण भ्रष्टाचाराचे केवळ आरोप झाल्यानंतर अशोक चव्हाणांचा राजीनामा घेणार्‍या सोनिया गांधी सुप्रीम कोर्टाकडून दोषी सिद्ध झालेल्या विलासरावांना किती काळ पाठिशी घालतील हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2010 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close