S M L

सानंदा प्रकरणी विलासरावांचा दबावाला दुजोरा

17 डिसेंबरआमदार सानंदा यांना वाचवण्यासाठी विलासराव देशमुख यांनी दबाव आणल्याचा ठपका ठेवत कोर्टानं दंड ठोठावला. आणि तेव्हा सानंदा यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी आपली परवानगी घ्यावी असे आदेश तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. पण आपण त्याला विरोध केला होता असा गौप्यस्फोट बुलढाण्याचे तत्कालीन एसपी कृष्णप्रकाश यांनी केला. बुलढाण्याचे तत्कालीन एसपी कृष्णप्रकाश यांनीही विलासारावांनी दबाव आणल्याचा आरोपाला दुजोरा दिला. या प्रकरणी 6 गुन्हे दाखल झाले होते पण हे गुन्हे रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे जिल्हाधिर्‍यांनी आदेश लेखी स्वरूपात पोलीस प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी उघड केले आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाला आलेल्या दूरध्वनींचे आणि या लेखी आदेशांचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बी.टी.सुग्ंाधी यांनी पोलिस डायरीत नमूद केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे विलासराव देशमुख यांच्या सरकारच्या सावकार विरोधी धोरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2010 11:15 AM IST

सानंदा प्रकरणी विलासरावांचा दबावाला दुजोरा

17 डिसेंबर

आमदार सानंदा यांना वाचवण्यासाठी विलासराव देशमुख यांनी दबाव आणल्याचा ठपका ठेवत कोर्टानं दंड ठोठावला. आणि तेव्हा सानंदा यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी आपली परवानगी घ्यावी असे आदेश तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. पण आपण त्याला विरोध केला होता असा गौप्यस्फोट बुलढाण्याचे तत्कालीन एसपी कृष्णप्रकाश यांनी केला.

बुलढाण्याचे तत्कालीन एसपी कृष्णप्रकाश यांनीही विलासारावांनी दबाव आणल्याचा आरोपाला दुजोरा दिला. या प्रकरणी 6 गुन्हे दाखल झाले होते पण हे गुन्हे रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे जिल्हाधिर्‍यांनी आदेश लेखी स्वरूपात पोलीस प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी उघड केले आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाला आलेल्या दूरध्वनींचे आणि या लेखी आदेशांचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बी.टी.सुग्ंाधी यांनी पोलिस डायरीत नमूद केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे विलासराव देशमुख यांच्या सरकारच्या सावकार विरोधी धोरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2010 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close