S M L

कोर्टाच्या आदेशाला इनरकॉननं दाखवली केराची टोपली

18 डिसेंबरपुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारंण्यात सुरु असलेल्या इनरकॉन कंपनीच्या पवनउर्जा प्रकल्पाच्या कामाला मुंबई हाय कोर्टाने गुरुवारी स्थगिती दिली. पण कंपनीने हाय कोर्टाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली. हाय कोर्टाच्या आदेशाला 24 तास उलटून गेले असले तरी प्रकल्पाची काम मात्र वेगाने सुरुच आहेत. कुडे आणि खरपोडी परिसरात विविध यंत्रांव्दारे रस्त्याची कामं आणि वृक्ष तोड सुरुच असल्याचं निदर्शनाला आलं आहे. त्यामुळे आता 23 तारखेला होणार्‍या सुनावणीत आदेश न जुमानणार्‍या इनरकॉन कंपनीला कोर्टाच्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2010 09:37 AM IST

कोर्टाच्या आदेशाला इनरकॉननं दाखवली केराची टोपली

18 डिसेंबर

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारंण्यात सुरु असलेल्या इनरकॉन कंपनीच्या पवनउर्जा प्रकल्पाच्या कामाला मुंबई हाय कोर्टाने गुरुवारी स्थगिती दिली. पण कंपनीने हाय कोर्टाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली. हाय कोर्टाच्या आदेशाला 24 तास उलटून गेले असले तरी प्रकल्पाची काम मात्र वेगाने सुरुच आहेत. कुडे आणि खरपोडी परिसरात विविध यंत्रांव्दारे रस्त्याची कामं आणि वृक्ष तोड सुरुच असल्याचं निदर्शनाला आलं आहे. त्यामुळे आता 23 तारखेला होणार्‍या सुनावणीत आदेश न जुमानणार्‍या इनरकॉन कंपनीला कोर्टाच्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2010 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close