S M L

मंत्र्यांनी पक्षाला वेळ द्यावा - राहुल गांधी

19 डिसेंबरपक्ष कार्यात सामान्य कार्यकर्त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. सर्व मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी थोडा वेळ कार्यकर्त्यांसाठी द्यावा असा सल्ला काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी दिला. भ्रष्टाचाराशी लढलं पाहिजे आणि दोषींना कडक शिक्षा मिळाली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे असंही ते म्हणाले.दिल्लीत काँग्रेसच्या 83व्या महाअधिवेशनात राहुल गांधी बोलत होते. मात्र दोन दिवसांपूर्वी विकिलकसने केलेल्या गौप्यस्फोटाबाबत बोलणं टाळलं.विकिलिक्सनं अमेरिकेचे राजदूत टिमोथी रोमर आणि राहुल गांधी यांच्यातले संभाषण उघड केलं. मुस्लीम दहशतवाद्यांपेक्षा, हिंदू कट्टरपंथीयांपासून देशाला जास्त धोका असल्याचं राहुल गांधी यांनी अमेरिकी राजदूताला म्हणाले आहे. विकिलिक्सनं त्यांच्या वेबसाईटवर दिल्लीहून वॉशिंग्टन डिसीला पाठवण्यात आलेली. 4 हजार गोपनीय कागदपत्रं उघडकीला आणली. विकिलिक्सच्या गौप्यस्फोटानंतर आपल्या दहशतवादासंबंधीच्या मताबाबात राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं. कोणत्याही स्वरुपाचा दहशतवाद हा भारतासाठी धोकादायकच आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्यांबाबत आपण दक्ष राहणं गरजेचं आहे असही राहुल गांधी यांनी म्हटलं. विकिलिक्सच्या गौप्यस्फोटानंतर राहुल गांधींच हे स्पष्टीकरण काँगे्रसकडून अधिकृतरित्या देण्यात आलं.या गौप्यस्फोटानंतर प्रथमचं राहुल गांधी 83व्या महाअधिवेशनात निम्मित मीडियासमोर आले. मात्र या विषयावर बोलण्यापेक्षा राहुल गांधी यांनी शांत राहण पंसत केल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2010 01:40 PM IST

मंत्र्यांनी पक्षाला वेळ द्यावा - राहुल गांधी

19 डिसेंबर

पक्ष कार्यात सामान्य कार्यकर्त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. सर्व मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी थोडा वेळ कार्यकर्त्यांसाठी द्यावा असा सल्ला काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी दिला. भ्रष्टाचाराशी लढलं पाहिजे आणि दोषींना कडक शिक्षा मिळाली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे असंही ते म्हणाले.दिल्लीत काँग्रेसच्या 83व्या महाअधिवेशनात राहुल गांधी बोलत होते. मात्र दोन दिवसांपूर्वी विकिलकसने केलेल्या गौप्यस्फोटाबाबत बोलणं टाळलं.

विकिलिक्सनं अमेरिकेचे राजदूत टिमोथी रोमर आणि राहुल गांधी यांच्यातले संभाषण उघड केलं. मुस्लीम दहशतवाद्यांपेक्षा, हिंदू कट्टरपंथीयांपासून देशाला जास्त धोका असल्याचं राहुल गांधी यांनी अमेरिकी राजदूताला म्हणाले आहे. विकिलिक्सनं त्यांच्या वेबसाईटवर दिल्लीहून वॉशिंग्टन डिसीला पाठवण्यात आलेली. 4 हजार गोपनीय कागदपत्रं उघडकीला आणली. विकिलिक्सच्या गौप्यस्फोटानंतर आपल्या दहशतवादासंबंधीच्या मताबाबात राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं. कोणत्याही स्वरुपाचा दहशतवाद हा भारतासाठी धोकादायकच आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्यांबाबत आपण दक्ष राहणं गरजेचं आहे असही राहुल गांधी यांनी म्हटलं. विकिलिक्सच्या गौप्यस्फोटानंतर राहुल गांधींच हे स्पष्टीकरण काँगे्रसकडून अधिकृतरित्या देण्यात आलं.

या गौप्यस्फोटानंतर प्रथमचं राहुल गांधी 83व्या महाअधिवेशनात निम्मित मीडियासमोर आले. मात्र या विषयावर बोलण्यापेक्षा राहुल गांधी यांनी शांत राहण पंसत केल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2010 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close