S M L

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांच्यावर अंत्यसंस्कार

20 डिसेंबरप्रसन्न व्यक्तिमत्वाचे ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सुभाष भेंडे यांच्यावर थोड्याच वेळापूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक ज्येष्ठ साहित्यिक, त्यांचे चाहते आणि वाचक उपस्थित होते. आज पहाटे ब्रेन स्ट्रोकमुळे साहित्य सहवासातल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं निधन झालं. कर्‍हाडला 2003 मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे डॉ. भेंडे अध्यक्ष होते. समीक्षात्मक लिखाणाबरोबरच, विनोदी प्रहसनं, कथा -कादंबर्‍या आणि प्रवास वर्णनं भेंडे यांनी लिहिली आणि त्याला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. जेथे जाते तेथे, दिलखुलास, हसवेगिरी, अंधारवाटा , द्राक्ष आणि रुद्राक्ष, उद्‌ध्वस्त, किनारा या त्यांच्या काही गाजलेल्या साहित्यकृती आहेत. मुळचे गोव्याचे असलेले भेंडे यांची भाषाशैली अतिशय सहज होती. मराठी भाषेवर, संस्कृतीवर त्यांचं मनापासून प्रेम होतं.मुंबईत इतकी वर्ष राहूनही त्यांचा ओढा गोव्याकडे होता. होमकुंड, ही गोव्यातल्या तीन पिढ्यांच्या जीवनावर आधारित त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. नर्म विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भेंडे अर्थशास्त्राचे पी.एच.डी होते. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. अर्थशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता.लिखाणाबरोबरच प्रवासाचा त्यांना छंद होता. त्यांनी अनेकदा परदेश प्रवास केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2010 10:25 AM IST

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांच्यावर अंत्यसंस्कार

20 डिसेंबर

प्रसन्न व्यक्तिमत्वाचे ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सुभाष भेंडे यांच्यावर थोड्याच वेळापूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक ज्येष्ठ साहित्यिक, त्यांचे चाहते आणि वाचक उपस्थित होते. आज पहाटे ब्रेन स्ट्रोकमुळे साहित्य सहवासातल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं निधन झालं. कर्‍हाडला 2003 मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे डॉ. भेंडे अध्यक्ष होते. समीक्षात्मक लिखाणाबरोबरच, विनोदी प्रहसनं, कथा -कादंबर्‍या आणि प्रवास वर्णनं भेंडे यांनी लिहिली आणि त्याला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. जेथे जाते तेथे, दिलखुलास, हसवेगिरी, अंधारवाटा , द्राक्ष आणि रुद्राक्ष, उद्‌ध्वस्त, किनारा या त्यांच्या काही गाजलेल्या साहित्यकृती आहेत. मुळचे गोव्याचे असलेले भेंडे यांची भाषाशैली अतिशय सहज होती. मराठी भाषेवर, संस्कृतीवर त्यांचं मनापासून प्रेम होतं.मुंबईत इतकी वर्ष राहूनही त्यांचा ओढा गोव्याकडे होता. होमकुंड, ही गोव्यातल्या तीन पिढ्यांच्या जीवनावर आधारित त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. नर्म विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भेंडे अर्थशास्त्राचे पी.एच.डी होते. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. अर्थशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता.लिखाणाबरोबरच प्रवासाचा त्यांना छंद होता. त्यांनी अनेकदा परदेश प्रवास केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2010 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close