S M L

राज यांच्या भेटीचा राजकीय अर्थ लावू नये ; शिवसेनेशी युती कायम - नितीन गडकरी

21 डिसेंबरमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही त्यामुळे राज यांच्या भेटीचा राजकीय अर्थ लावू नये असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. काल राज ठाकरे यांनी मुंबईतल्या भाजपच्या कार्यालयाला भेट दिली हेती. त्यावरून शिवसेनाप्रमुखांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यावर मनसेशी युतीचा भाजपचा कोणताही प्रस्ताव नाही भाजप आणि शिवसेना जुने सोबती आहेत. आणि ही युती कायम राहील असं ग़डकरी यांनी म्हटलं आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी भेटीचे स्पष्टीकरण दिले आहेत. आता कोणतीही समस्या असण्याचे कारण नाही असं गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच एनडीएच्या रॅलीमध्ये शिवसेना सहभागी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2010 09:27 AM IST

राज यांच्या भेटीचा राजकीय अर्थ लावू नये ; शिवसेनेशी युती कायम - नितीन गडकरी

21 डिसेंबर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही त्यामुळे राज यांच्या भेटीचा राजकीय अर्थ लावू नये असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. काल राज ठाकरे यांनी मुंबईतल्या भाजपच्या कार्यालयाला भेट दिली हेती. त्यावरून शिवसेनाप्रमुखांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यावर मनसेशी युतीचा भाजपचा कोणताही प्रस्ताव नाही भाजप आणि शिवसेना जुने सोबती आहेत. आणि ही युती कायम राहील असं ग़डकरी यांनी म्हटलं आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी भेटीचे स्पष्टीकरण दिले आहेत. आता कोणतीही समस्या असण्याचे कारण नाही असं गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच एनडीएच्या रॅलीमध्ये शिवसेना सहभागी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2010 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close