S M L

कांद्यानं केला वांदा

21 डिसेंबरदेशभरात कांद्याचे दर कडाडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आलं आहे.सरकारने या कांद्यावर निर्यातबंदी घालून कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. दर कमी करण्यासाठी सर्व पावले उचलली जातील असं आश्वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही दिलं आहे. दरम्यान, कांद्याच्या किंमती लवकरच खाली येतील, असं सांगत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भाववाढीसाठी अवकाळी पावसाला जबाबदार धरलं आहे.कांद्याचे दर अचानक का वाढले याचं स्पष्टीकरण वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी दिलं. 'साठेबाजीमुळेच कांद्याचे दर वाढले आहे. देशात कांद्याचा पुरेसा साठा आहे. कांद्याच्या वाढत्या दरांमुळे विरोधकांच्या हाती मात्र सरकारला घेरण्यासाठी आणखी एक हत्यार मिळालं आहे. यावर विरोधक म्हणता की, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली आणि टंचाई भरून काढण्यासाठी पाकिस्तानहून कांद्याची आयात सुरू केली. तर नाफेडनं राजधानी दिल्लीत सवलतीच्या दरात कांदा विकायला सुरुवात केली. पण कांद्याचे दर नेमके कधी खाली येणार हे नक्की माहीत नसल्यानं सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात मात्र महागलेल्या कांद्याने पाणी आणलं आहे.कांद्याचे दर का वाढले ? खरिपाचा लाल कांदा अवकाळी पावसामुळे खराब झाला रब्बीचा रांगडा कांदा अजून मार्केटमध्ये यायचा आहे. (जानेवारी नंतर हा मार्केटमध्ये येईल) एकरी दहा ट्रॅक्टर एवढे कांद्याचे उत्पादन व्हायला हवं. मात्र आता एकरी केवळ दोन ट्रॅक्टर एवढंच उत्पादन आहे. आजच्या घडीला कांद्याचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त झाली. येत्या 15 जानेवरीपर्यंत कांद्याचा भाव वाढलेलला राहण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी लाल रांगडा कांदा बाजारात आल्यावर भाव कमी होतील अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केला. लाल रांगडा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असते कारण त्याचे उत्पादन एकरी 150 क्वींटलपर्यंत असते आणि या वर्षी ते आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण या वर्षीचे हावमान रांगडा कांद्यासाठी पोषक होतं. त्यामुळे हा कांदा बाजारात आल्यावर कांद्याचे भाव कमी होताल असा अंदाज व्यक्त केला जातो. सध्या बाजारात लाल पोळ कांदा उपलब्ध आहे तो नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान बाजारात असतो जानेवरीत लाल रांगडा कांदा बाजारात येतो तो साधारणपणे मार्च अखेरपर्यंत बाजारात असतो. मार्चनंतर लाल उन्हाळी कांदा बाजारात येतो. कांद्याचे आजचे भावमुंबई : 70 रुपयेपुणे : 65 रुपयेनागपूर : 70 रुपयेनाशिक : 60 रुपयेऔरंगाबाद : 50 रुपयेराज्यभरात कांद्याचे भाव कमी होण्यासाठी दोन आठवडे वाट पाहावी लागणार आहे कांद्याच्या पाठोपाठ भाज्यांचे भाव ही गगणाला भिडले आहे.औरंगाबादमधील भाज्यांचे भाव कांदा -50 रू. किलोभेंडी - 60 रूपये किलोटोमॅटो- 30 रूपये किलोपत्ताकोबी - 45 ते 50 रूपये किलोफुलकोबी- 30 रूपये किलोभोपळा- 30 रूपये किलोलसूण- 80 रूपये किलोलसूण छोटी, किंमत मोठी - मुंबईघाऊक बाजार : 300 रु. किलोकिरकोळ बाजार : 400 रु. किलोजुन्नरघाऊक बाजार : 250 रु. किलोकिरकोळ बाजार : 300 रु. किलोसांगलीघाऊक बाजार : 250 रु. किलोकिरकोळ बाजार : 260 रु. किलोकोल्हापूरवागी - 40 रुपये किलोढबु - 40 रुपये किलोकांदा - 65 ते 70 रुपये किलोदोडका - 45 रुपये किलोलसुन - 220 रुपये किलोगवारी - 40 रुपये किलो.कारलं - 30 रुपये किलोपुणे कांदा - 60 ते 70 रु. किलो गाजर - 80 रु. किलोकोबी - 32 रु. किलो फ्लॉवर - 80 रु. किलोटोमॅटो - 80 रु. किलोमटार - 40 रु. किलोभेंडी - 80 रु. किलोपालक - 9 रु. जुडी

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2010 04:42 PM IST

कांद्यानं केला वांदा

21 डिसेंबर

देशभरात कांद्याचे दर कडाडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आलं आहे.सरकारने या कांद्यावर निर्यातबंदी घालून कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. दर कमी करण्यासाठी सर्व पावले उचलली जातील असं आश्वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही दिलं आहे. दरम्यान, कांद्याच्या किंमती लवकरच खाली येतील, असं सांगत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भाववाढीसाठी अवकाळी पावसाला जबाबदार धरलं आहे.

कांद्याचे दर अचानक का वाढले याचं स्पष्टीकरण वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी दिलं. 'साठेबाजीमुळेच कांद्याचे दर वाढले आहे. देशात कांद्याचा पुरेसा साठा आहे. कांद्याच्या वाढत्या दरांमुळे विरोधकांच्या हाती मात्र सरकारला घेरण्यासाठी आणखी एक हत्यार मिळालं आहे. यावर विरोधक म्हणता की, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली आणि टंचाई भरून काढण्यासाठी पाकिस्तानहून कांद्याची आयात सुरू केली. तर नाफेडनं राजधानी दिल्लीत सवलतीच्या दरात कांदा विकायला सुरुवात केली. पण कांद्याचे दर नेमके कधी खाली येणार हे नक्की माहीत नसल्यानं सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात मात्र महागलेल्या कांद्याने पाणी आणलं आहे.

कांद्याचे दर का वाढले ?

खरिपाचा लाल कांदा अवकाळी पावसामुळे खराब झाला रब्बीचा रांगडा कांदा अजून मार्केटमध्ये यायचा आहे. (जानेवारी नंतर हा मार्केटमध्ये येईल) एकरी दहा ट्रॅक्टर एवढे कांद्याचे उत्पादन व्हायला हवं. मात्र आता एकरी केवळ दोन ट्रॅक्टर एवढंच उत्पादन आहे. आजच्या घडीला कांद्याचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त झाली. येत्या 15 जानेवरीपर्यंत कांद्याचा भाव वाढलेलला राहण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी लाल रांगडा कांदा बाजारात आल्यावर भाव कमी होतील अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केला. लाल रांगडा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असते कारण त्याचे उत्पादन एकरी 150 क्वींटलपर्यंत असते आणि या वर्षी ते आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण या वर्षीचे हावमान रांगडा कांद्यासाठी पोषक होतं. त्यामुळे हा कांदा बाजारात आल्यावर कांद्याचे भाव कमी होताल असा अंदाज व्यक्त केला जातो. सध्या बाजारात लाल पोळ कांदा उपलब्ध आहे तो नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान बाजारात असतो जानेवरीत लाल रांगडा कांदा बाजारात येतो तो साधारणपणे मार्च अखेरपर्यंत बाजारात असतो. मार्चनंतर लाल उन्हाळी कांदा बाजारात येतो.

कांद्याचे आजचे भाव

मुंबई : 70 रुपयेपुणे : 65 रुपयेनागपूर : 70 रुपयेनाशिक : 60 रुपयेऔरंगाबाद : 50 रुपये

राज्यभरात कांद्याचे भाव कमी होण्यासाठी दोन आठवडे वाट पाहावी लागणार आहे कांद्याच्या पाठोपाठ भाज्यांचे भाव ही गगणाला भिडले आहे.

औरंगाबादमधील भाज्यांचे भाव

कांदा -50 रू. किलोभेंडी - 60 रूपये किलोटोमॅटो- 30 रूपये किलोपत्ताकोबी - 45 ते 50 रूपये किलोफुलकोबी- 30 रूपये किलोभोपळा- 30 रूपये किलोलसूण- 80 रूपये किलोलसूण छोटी, किंमत मोठी

- मुंबई

घाऊक बाजार : 300 रु. किलोकिरकोळ बाजार : 400 रु. किलो

जुन्नर

घाऊक बाजार : 250 रु. किलोकिरकोळ बाजार : 300 रु. किलो

सांगली

घाऊक बाजार : 250 रु. किलोकिरकोळ बाजार : 260 रु. किलो

कोल्हापूर

वागी - 40 रुपये किलोढबु - 40 रुपये किलोकांदा - 65 ते 70 रुपये किलोदोडका - 45 रुपये किलोलसुन - 220 रुपये किलोगवारी - 40 रुपये किलो.कारलं - 30 रुपये किलो

पुणे

कांदा - 60 ते 70 रु. किलो गाजर - 80 रु. किलोकोबी - 32 रु. किलो फ्लॉवर - 80 रु. किलोटोमॅटो - 80 रु. किलोमटार - 40 रु. किलोभेंडी - 80 रु. किलोपालक - 9 रु. जुडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2010 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close