S M L

पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा भाजपची मागणी

22 डिसेंबरघोटाळयांच्या मुद्द्यावर यूपीए सरकारची कोंडी करण्यासाठी एनडीएने आंदोलन तीव्र केले आहे. यूपीएविरोधातल्या देशव्यापी आंदोलनाला एनडीएने आज दिल्लीतून सुरुवात केली. यूपीए सरकारमधल्या भ्रष्टाचाराविरोधात आज भाजप आणि मित्रपक्षांनी महासंग्राम सभा आयोजित केली होती. यावेळी भाजपने पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग याचंा राजीनामा मागितला असून त्यांना पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही असा आरोप केला. तर भाजपला भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचा काहीच अधिकार नाही असा प्रतिहल्ला काँग्रेसने केला. भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी महासंग्रामाची सुरवात दिल्लीच्या रामलीला मैदानावर धडाक्यात झाली. यावेळी भाजपने थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर हल्ला केला.आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. टू जी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसी स्थापन केल्याशिवाय नैतिकतेच्या गप्पा मारू नका असा टोमाणाही भाजपने पंतप्रधानांना मारला. उद्धव ठाकरे, नितीश कुमार किंवा प्रकाश सिंग बादल हे मित्रपक्षांचे तीनही बडे नेते सभेला उपस्थित नव्हते. हे नेते त्या त्या राज्यांतल्या सभांना उपस्थित राहतील अशी सारवासारव भाजपने केली. दरम्यान, टू जी, कॉमवेल्थ, आदर्श, आयपीएल, कॉमनवेल्थ ची नेमणूक अशा सर्व मुद्द्यांवर भाजपने पंतप्रधांनावर हल्ला केल्याने काँग्रेसनेही जोरदार प्रतिहल्ला केला. पुढचे दोन महिने एनडीएचे हे महासंग्राम आंदोनल चालणार आहे. आणि या लोकल सभांनंतर पुढे लोकसभेत म्हणजे अर्थकृसंकल्पीय अधिवेशनातही सुरू राहणार आहे. त्यामुळे या हिवाळ्यात तापमान वाढणार हे निश्चित.ममता बॅनर्जीनी केला काँग्रेसवर हल्लाबोलरेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला उघड आव्हान दिलं. आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसबरोबर आघाडी तोडण्याची धमकीही त्यांनी दिली. पश्चिम बंगाल सरकार केंद्रीय सुरक्षा दलांचा गैरवापर करत आहे. हे आपण सिद्ध करून दाखवू हे सिद्ध झाले नसल्यास पदाचा त्याग करू असं ममतांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 10:15 AM IST

पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा भाजपची मागणी

22 डिसेंबर

घोटाळयांच्या मुद्द्यावर यूपीए सरकारची कोंडी करण्यासाठी एनडीएने आंदोलन तीव्र केले आहे. यूपीएविरोधातल्या देशव्यापी आंदोलनाला एनडीएने आज दिल्लीतून सुरुवात केली. यूपीए सरकारमधल्या भ्रष्टाचाराविरोधात आज भाजप आणि मित्रपक्षांनी महासंग्राम सभा आयोजित केली होती. यावेळी भाजपने पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग याचंा राजीनामा मागितला असून त्यांना पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही असा आरोप केला. तर भाजपला भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचा काहीच अधिकार नाही असा प्रतिहल्ला काँग्रेसने केला.

भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी महासंग्रामाची सुरवात दिल्लीच्या रामलीला मैदानावर धडाक्यात झाली. यावेळी भाजपने थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर हल्ला केला.आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. टू जी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसी स्थापन केल्याशिवाय नैतिकतेच्या गप्पा मारू नका असा टोमाणाही भाजपने पंतप्रधानांना मारला.

उद्धव ठाकरे, नितीश कुमार किंवा प्रकाश सिंग बादल हे मित्रपक्षांचे तीनही बडे नेते सभेला उपस्थित नव्हते. हे नेते त्या त्या राज्यांतल्या सभांना उपस्थित राहतील अशी सारवासारव भाजपने केली. दरम्यान, टू जी, कॉमवेल्थ, आदर्श, आयपीएल, कॉमनवेल्थ ची नेमणूक अशा सर्व मुद्द्यांवर भाजपने पंतप्रधांनावर हल्ला केल्याने काँग्रेसनेही जोरदार प्रतिहल्ला केला.

पुढचे दोन महिने एनडीएचे हे महासंग्राम आंदोनल चालणार आहे. आणि या लोकल सभांनंतर पुढे लोकसभेत म्हणजे अर्थकृसंकल्पीय अधिवेशनातही सुरू राहणार आहे. त्यामुळे या हिवाळ्यात तापमान वाढणार हे निश्चित.

ममता बॅनर्जीनी केला काँग्रेसवर हल्लाबोल

रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला उघड आव्हान दिलं. आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसबरोबर आघाडी तोडण्याची धमकीही त्यांनी दिली. पश्चिम बंगाल सरकार केंद्रीय सुरक्षा दलांचा गैरवापर करत आहे. हे आपण सिद्ध करून दाखवू हे सिद्ध झाले नसल्यास पदाचा त्याग करू असं ममतांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close