S M L

ट्रॅव्हल कंपंन्यांकडून मिळणारं बुकिंग एजंट्सचं कमिशन बंद

1 नोव्हेंबर, दिल्लीएअरलाईन्स कंपन्यांनी आजपासून ट्रॅव्हल एजंट्सना कमिशन देणं पूर्णपणे बंद केलं आहे. त्यामुळे विमानाचं तिकिट जर ट्रॅव्हल एजंटकरवी आरक्षीत करायचं असेल तर आता साडेतीनशे ते दहा हजार रुपये जास्त द्यावे लागतील. एअरलाईन्स कंपन्यांनी नाकारलेलं हे कमिशन , ट्रॅव्हल एजंट्स आता ' ट्रॅन्झॅक्शन फी ' च्या स्वरुपात प्रवाशांकडून वसूल करतील. इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर साडेतीनशे रुपये तर बिझनेस क्लाससाठी पाचशे रुपये ट्रॅन्झॅक्शन फि ट्रॅव्हल एजंट्सना द्यावी लागेल. तसंच ट्रॅव्हल एजंट्स देशाबाहेरच्या विमानप्रवासासाठी इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर बाराशे रुपये आणि फर्स्टक्लाससाठी दहा हजार रुपयांपर्यंत ट्रॅन्झॅक्शन फी घेऊ शकतील. मात्र कोणत्याही एअरलाईन्सच्या वेबसाईटवरुन थेट आरक्षण केल्यास ट्रॅन्झॅक्शन फी लागणार नाही. या ट्रॅन्झॅक्शन फी वर कोलकाता उच्च न्यायालयानं परवापर्यंत स्थगिती आणली आहे , आता तीन तारखेलाच यासंबंधी निर्णय होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2008 01:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2008 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close