S M L

बिल्डरच्या पूतण्याचा नागरिकांवर हल्ला

22 डिसेंबरपुण्यापासून 12 किलोमीटर अंतरावर खडकवासला ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका बिल्ंडिगच्या बांधकामाच्या वादातून महिला लहान मुलांसह ग्रामस्थांना शिवीगाळ मारहाणीचा प्रकार घडला. बिल्ंडिगला कायदेशीर मान्यता नसताना बांधकामामुळे येण्या जाण्याच्या रस्त्यावर आक्रमण होत असल्याचा कोल्हेवाडी ग्रामस्थांचा बिल्डर विलास मतेंवर आरोप आहे. या वादातून मतेंचा पुतण्या कुणाल याने 30-40 जणांसह बांधकामाच्या विटांनी हल्ला चढवत गाड्यांची तोडफोड करत ग्रामस्थांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला तर बिल्डर विलास मते यांनी गावकर्‍यांवर दमदाटी दादागिरीचा प्रतिआरोप केला. या प्रकरणी खडकवासला पोलीस चौकीत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी दंगलीचाही गुन्हा दाखल झाला. मारहाणीत जखमी झालेले शिवसेनेचे माजी सरपंच विजय कोल्हे यांना खाजगी रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विलास मतेही शिवसेनेचेच कार्यकर्ते आहेत. या प्रकरणामुळे कोल्हेवाडी- किरकिटवाडी परिसरात भितीचे वातावरण आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 04:08 PM IST

बिल्डरच्या पूतण्याचा नागरिकांवर हल्ला

22 डिसेंबर

पुण्यापासून 12 किलोमीटर अंतरावर खडकवासला ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका बिल्ंडिगच्या बांधकामाच्या वादातून महिला लहान मुलांसह ग्रामस्थांना शिवीगाळ मारहाणीचा प्रकार घडला. बिल्ंडिगला कायदेशीर मान्यता नसताना बांधकामामुळे येण्या जाण्याच्या रस्त्यावर आक्रमण होत असल्याचा कोल्हेवाडी ग्रामस्थांचा बिल्डर विलास मतेंवर आरोप आहे. या वादातून मतेंचा पुतण्या कुणाल याने 30-40 जणांसह बांधकामाच्या विटांनी हल्ला चढवत गाड्यांची तोडफोड करत ग्रामस्थांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला तर बिल्डर विलास मते यांनी गावकर्‍यांवर दमदाटी दादागिरीचा प्रतिआरोप केला. या प्रकरणी खडकवासला पोलीस चौकीत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी दंगलीचाही गुन्हा दाखल झाला. मारहाणीत जखमी झालेले शिवसेनेचे माजी सरपंच विजय कोल्हे यांना खाजगी रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विलास मतेही शिवसेनेचेच कार्यकर्ते आहेत. या प्रकरणामुळे कोल्हेवाडी- किरकिटवाडी परिसरात भितीचे वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close