S M L

साध्वी प्रज्ञाला कायदेशीर मदत देणार -खा. संजय राऊत

01 नोव्हेंबर,दिल्ली - साध्वी प्रज्ञाला कायदेशीर मदत देणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. अफजल गुरु आणि दाऊदला कायदेशीर मदत मिळू शकते. तर साध्वीला का नाही असा सवालही त्यांनी केला. नवी दिल्ली इथे बोलत असताना ते म्हणाले जे लोक पकडले आहेत ते दहशतवादी नाहीत. त्यांना संशयावरून ताब्यात घेतलंय. त्याच्यावरील आरोप अजून सिद्ध व्हायचे आहेत. असं असलं तरी सरकार, मीडिया त्यांना दहशतवादी ठरवून त्यांना बदनाम करत आहेत.याप्रकरणी एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेला त्यांना मदत करणं गरजेचं आहे असं ते पुढे म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2008 02:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2008 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close