S M L

अखेर दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला

27 डिसेंबरगेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू असलेला लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महापालिकेनं अखेर हटवला आहे. रात्री दोन ते सव्वादोनच्या सुमाराला हा पुतळा हलवण्यात आला. यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. यावेळी पोलिसांनी शिवसनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांच्यासह 32 जणांना ताब्यात घेतलं. नंतर त्यांना सोडून देण्यात आले. संभाजी ब्रिगेडने पुतळा हलवण्यासाठी अनेक आंदोलन केली. माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपूर्वी महापालिकेसमोर मोठं आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी पुतळा हटवण्याचे आश्वासन दिलं. त्यानंतर मोठा गोंधळ झाला. त्यामुळे महापौरांनी घूमजाव करत इतिहास तज्ञांची समिती नेमून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले होते. पण अचानक गेल्या आठवड्यात महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर पुतळा हटवण्याचा ठराव संमत केला. आणि त्यानुसार पुतळा हलवण्यात आला. हा पुतळा आता पु.ल. देशपांडे उद्यानात ठेवण्यात आला. आज(सोमवारी) सकाळपासून लाल महालात दादोजी कोंडदेव यांचा पुतळा दिसणार नाही. काल रात्री पुतळा हटवताना विरोध करणार्‍या शिवसनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांच्यासह 32 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काही तासानी त्यांना सोडून देण्यात आले. जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकावरून संभाजी ब्रिगेडने भांडारकर इन्स्टीट्यूटची मोडतोड केली होती. त्यानंतर पुतळा हलवण्याची मागणी जोर धरू लागली. संभाजी ब्रिगेडने त्यासाठी अनेक आंदोलन केली. माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपूर्वी महानगरपालिकेसमोर मोठ आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी पुतळा हटवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मोठा गोंधळ झाला. त्यामुळे महापौरांनी घुमजाव करत इतिहास तज्ञाची समिती नेमून निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं. पण अचानक मागच्या आठवड्यात महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर पुतळा हटवण्याचा ठराव संमत केला. त्याला शिवसेना-भाजप-मनसेनं विरोध केला. हा पुतळा हटवू नये म्हणून इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी जिल्हा कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर पुणे महानगरपालिकेनंही कॅव्हट दाखल केली आहे. शिवसेना -भाजपने पुतळा हटवण्याच्या विरोधात आज दीड वाजता मोर्चाचे आयोजन केले होते. सद्या या परिसरात जमावबंदी आहे. इथं कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.महापौर झोपेत असताना कारवाई !लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महानगरपालिकेने रात्री दोन ते सव्वादोनच्या सुमाराला हा पुतळा हलवण्यात आला. पण त्याबाबत आपल्याला काहीही माहिती नव्हती असा खुलासा पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी केला.आपण झोपेत असतांनाच पुतळा काढण्यात आला असा दावा त्यांनी केला.संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केलाजेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकावरून संभाजी ब्रिगेडने भांडारकर इन्स्टीट्यूटची मोडतोड केली होती. त्यानंतर लालमहलातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हजवुन राहणारचं असा पवित्रा घेताला होता. अखेर लालमहलात मध्यरात्री दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.छत्रपती शिवाजींच्या जडणघडणीत दादोजी कोंडदेवांचाही हात - विश्वास पाटीलदरम्यान दादोजी कोंेडदेव यांच्या वादात आता विश्वास पाटील यांनीही उडी घेतली. मी वाचलेल्या इतिहासात छत्रपती शिवाजींच्या जडणघडणीत दादोजी कोंडदेवांचाही हात होता असं मत पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2010 09:37 AM IST

अखेर दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला

27 डिसेंबर

गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू असलेला लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महापालिकेनं अखेर हटवला आहे. रात्री दोन ते सव्वादोनच्या सुमाराला हा पुतळा हलवण्यात आला. यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. यावेळी पोलिसांनी शिवसनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांच्यासह 32 जणांना ताब्यात घेतलं. नंतर त्यांना सोडून देण्यात आले. संभाजी ब्रिगेडने पुतळा हलवण्यासाठी अनेक आंदोलन केली. माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपूर्वी महापालिकेसमोर मोठं आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी पुतळा हटवण्याचे आश्वासन दिलं. त्यानंतर मोठा गोंधळ झाला. त्यामुळे महापौरांनी घूमजाव करत इतिहास तज्ञांची समिती नेमून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले होते. पण अचानक गेल्या आठवड्यात महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर पुतळा हटवण्याचा ठराव संमत केला. आणि त्यानुसार पुतळा हलवण्यात आला. हा पुतळा आता पु.ल. देशपांडे उद्यानात ठेवण्यात आला.

आज(सोमवारी) सकाळपासून लाल महालात दादोजी कोंडदेव यांचा पुतळा दिसणार नाही. काल रात्री पुतळा हटवताना विरोध करणार्‍या शिवसनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांच्यासह 32 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काही तासानी त्यांना सोडून देण्यात आले. जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकावरून संभाजी ब्रिगेडने भांडारकर इन्स्टीट्यूटची मोडतोड केली होती. त्यानंतर पुतळा हलवण्याची मागणी जोर धरू लागली. संभाजी ब्रिगेडने त्यासाठी अनेक आंदोलन केली. माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपूर्वी महानगरपालिकेसमोर मोठ आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी पुतळा हटवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मोठा गोंधळ झाला. त्यामुळे महापौरांनी घुमजाव करत इतिहास तज्ञाची समिती नेमून निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं. पण अचानक मागच्या आठवड्यात महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर पुतळा हटवण्याचा ठराव संमत केला. त्याला शिवसेना-भाजप-मनसेनं विरोध केला. हा पुतळा हटवू नये म्हणून इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी जिल्हा कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर पुणे महानगरपालिकेनंही कॅव्हट दाखल केली आहे. शिवसेना -भाजपने पुतळा हटवण्याच्या विरोधात आज दीड वाजता मोर्चाचे आयोजन केले होते. सद्या या परिसरात जमावबंदी आहे. इथं कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

महापौर झोपेत असताना कारवाई !

लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महानगरपालिकेने रात्री दोन ते सव्वादोनच्या सुमाराला हा पुतळा हलवण्यात आला. पण त्याबाबत आपल्याला काहीही माहिती नव्हती असा खुलासा पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी केला.आपण झोपेत असतांनाच पुतळा काढण्यात आला असा दावा त्यांनी केला.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला

जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकावरून संभाजी ब्रिगेडने भांडारकर इन्स्टीट्यूटची मोडतोड केली होती. त्यानंतर लालमहलातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हजवुन राहणारचं असा पवित्रा घेताला होता. अखेर लालमहलात मध्यरात्री दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

छत्रपती शिवाजींच्या जडणघडणीत दादोजी कोंडदेवांचाही हात - विश्वास पाटील

दरम्यान दादोजी कोंेडदेव यांच्या वादात आता विश्वास पाटील यांनीही उडी घेतली. मी वाचलेल्या इतिहासात छत्रपती शिवाजींच्या जडणघडणीत दादोजी कोंडदेवांचाही हात होता असं मत पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2010 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close