S M L

देशव्यापी सुरक्षेसाठी अलर्ट जारी

27 डिसेंबरकेंद्रीय गृहमंत्रालयाने देशव्यापी सुरक्षेसाठी अलर्ट जारी केला आहे. लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडली याने भेट दिलेल्या ठिकाणी अतिरेकी हल्ले होऊ शकतात असा इशारा गृहमंत्रालयाने दिला आहे. देशभरातल्या ताज हॉटेलसाठी विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी महफूज आलम याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी चार अतिरेकी मुंबईत घुसल्याची माहिती दिली होती. दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा कट असल्याचा संशय आहे. दरम्यान, आणखी संशयित अतिरेकी कर्नाटकात घुसण्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. त्यामुळे कर्नाटकातही हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये अतिरिक्त निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2010 05:23 PM IST

देशव्यापी सुरक्षेसाठी अलर्ट जारी

27 डिसेंबर

केंद्रीय गृहमंत्रालयाने देशव्यापी सुरक्षेसाठी अलर्ट जारी केला आहे. लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडली याने भेट दिलेल्या ठिकाणी अतिरेकी हल्ले होऊ शकतात असा इशारा गृहमंत्रालयाने दिला आहे. देशभरातल्या ताज हॉटेलसाठी विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी महफूज आलम याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी चार अतिरेकी मुंबईत घुसल्याची माहिती दिली होती. दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा कट असल्याचा संशय आहे. दरम्यान, आणखी संशयित अतिरेकी कर्नाटकात घुसण्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. त्यामुळे कर्नाटकातही हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये अतिरिक्त निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2010 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close