S M L

बिनायक सेन यांचं वकीलपत्र राम जेठमलानी घेण्यास तयार

28 डिसेंबरज्येष्ठ वकील आणि भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनी आपल्याच पक्षाला धक्का दिला आहे. देशद्रोहाचा ठपका ठेवून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या डॉ. बिनायक सेन यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी त्यांनी दिली. बिनायक सेन यांच्याविरोधातला छत्तीसगड सरकारचा खटला कमकुवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आहे. आणि नक्षलवादी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध सरकारची भुमिका कडक आहे. तरीही जेठमलानी यांनी सेन यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली. अशा प्रकरणात पक्षाचा संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी सेन यांना जामीन मिळण्यासाठीसुद्धा जेठमलानी यांनी केस लढवली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2010 10:53 AM IST

बिनायक सेन यांचं वकीलपत्र राम जेठमलानी घेण्यास तयार

28 डिसेंबर

ज्येष्ठ वकील आणि भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनी आपल्याच पक्षाला धक्का दिला आहे. देशद्रोहाचा ठपका ठेवून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या डॉ. बिनायक सेन यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी त्यांनी दिली. बिनायक सेन यांच्याविरोधातला छत्तीसगड सरकारचा खटला कमकुवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आहे. आणि नक्षलवादी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध सरकारची भुमिका कडक आहे. तरीही जेठमलानी यांनी सेन यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली. अशा प्रकरणात पक्षाचा संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी सेन यांना जामीन मिळण्यासाठीसुद्धा जेठमलानी यांनी केस लढवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2010 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close