S M L

ऍशेस सीरीज इंग्लंडने जिंकली

29 डिसेंबरऍशेस सीरीजच्या चौथ्या मेलबर्न टेस्टमध्ये इंग्लडने ऑस्ट्रेलियाचा एक इनिंग आणि 157 रन्सनी पराभव करत ऍशेसकप जिंक ला आहे.ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात पराभुत करत इंग्लंडने नवा इतिहास रचला. 24 वर्षानंतर इंग्लंडने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात ऍशेस कप जिंकला आहे. 1987 मध्ये इंग्लंडने पहिल्यांदा ऍशेस कसोटी जिंकली होती. मॅचच्या चवथ्या दिवशीच इंग्लडंने हा विजय मिळवला. कालच्या दिवसअखेर नॉट आऊट राहिलेल्या जॉन्सन आणि हॅडिन जोडीने दिवसाची सुरुवात केली पण फक्त 3 रन्सची भर घालत जॉन्सन 6 रन्सवर आऊट झाला. ट्रेमलेटने त्याची विकेट काढली. त्यानंतर पीटर सिडल आणि हॅडीनने 8व्या विकेटसाठी 86 रन्सची पार्टनरशिप केली. पण 40 रन्सवर असताना स्वॉनने हॅडीनची विकेट काढत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या हिल्फेनहॉसला ब्रेसननने आऊट करत इनिंगमधली चौथी विकेट पटकावली. दुखापतग्रस्त हॅरिस बॅटींगला येऊ शकला नाही. आणि तिथेच इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. ब्रेसनानने 4, स्वॉनने 2 तर ट्रेमलेट आणि अँडरसनने प्रत्येकी एक विकेट घेतली. 1956 नंतरचा ऑस्ट्रेलियावर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2010 10:36 AM IST

ऍशेस सीरीज इंग्लंडने जिंकली

29 डिसेंबर

ऍशेस सीरीजच्या चौथ्या मेलबर्न टेस्टमध्ये इंग्लडने ऑस्ट्रेलियाचा एक इनिंग आणि 157 रन्सनी पराभव करत ऍशेसकप जिंक ला आहे.ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात पराभुत करत इंग्लंडने नवा इतिहास रचला. 24 वर्षानंतर इंग्लंडने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात ऍशेस कप जिंकला आहे. 1987 मध्ये इंग्लंडने पहिल्यांदा ऍशेस कसोटी जिंकली होती. मॅचच्या चवथ्या दिवशीच इंग्लडंने हा विजय मिळवला. कालच्या दिवसअखेर नॉट आऊट राहिलेल्या जॉन्सन आणि हॅडिन जोडीने दिवसाची सुरुवात केली पण फक्त 3 रन्सची भर घालत जॉन्सन 6 रन्सवर आऊट झाला. ट्रेमलेटने त्याची विकेट काढली. त्यानंतर पीटर सिडल आणि हॅडीनने 8व्या विकेटसाठी 86 रन्सची पार्टनरशिप केली. पण 40 रन्सवर असताना स्वॉनने हॅडीनची विकेट काढत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या हिल्फेनहॉसला ब्रेसननने आऊट करत इनिंगमधली चौथी विकेट पटकावली. दुखापतग्रस्त हॅरिस बॅटींगला येऊ शकला नाही. आणि तिथेच इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. ब्रेसनानने 4, स्वॉनने 2 तर ट्रेमलेट आणि अँडरसनने प्रत्येकी एक विकेट घेतली. 1956 नंतरचा ऑस्ट्रेलियावर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2010 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close