S M L

कलमाडी यांना सीबीआयची समन्स

29 डिसेंबरकॉमनवेल्थच्या घोटाळ्याप्रकरणी आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना सीबीआयने समन्स बजावली. त्यांना 3 जानेवारीला हजर राहायला सांगण्यात आलं आहे. दरम्यान, घोटाळ्याच्या तपासात अडथळे आणत असल्याचा सीबीआयचा आरोप आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी फेटाळून लावला. आपण कधीच तपासकामात हस्तक्षेप केला नाही तसेच कागदपत्रं एकत्रित करायला कुणाला सांगितलंही नाही, असं कलमाडी यांनी स्पष्ट केलं.23 डिसेंबर रोजी कलमाडी यांनी एक सर्क्युलर काढलं होतं. आणि कॉमनवेल्थशी संबंधित सर्व कागदपत्रं एकाच रूममध्ये आणून ठेवा असे आदेश आपल्या सहकार्‍यांना दिले होते असा दावा सीबीआयने केला.आयोजन समितीला मुदतवाढ देण्याच्या सरकारच्या निर्णयाला कलमाडी यांचा विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शुंघलू समितीला घोटाळ्याचे सर्व रेकॉर्ड तपासता यावेत आणि आयोजन समितीच्या स्टाफची चौकशी करता यावी यासाठी सरकारने समितीला मुदतवाढ दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2010 03:14 PM IST

कलमाडी यांना सीबीआयची समन्स

29 डिसेंबर

कॉमनवेल्थच्या घोटाळ्याप्रकरणी आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना सीबीआयने समन्स बजावली. त्यांना 3 जानेवारीला हजर राहायला सांगण्यात आलं आहे. दरम्यान, घोटाळ्याच्या तपासात अडथळे आणत असल्याचा सीबीआयचा आरोप आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी फेटाळून लावला. आपण कधीच तपासकामात हस्तक्षेप केला नाही तसेच कागदपत्रं एकत्रित करायला कुणाला सांगितलंही नाही, असं कलमाडी यांनी स्पष्ट केलं.23 डिसेंबर रोजी कलमाडी यांनी एक सर्क्युलर काढलं होतं. आणि कॉमनवेल्थशी संबंधित सर्व कागदपत्रं एकाच रूममध्ये आणून ठेवा असे आदेश आपल्या सहकार्‍यांना दिले होते असा दावा सीबीआयने केला.आयोजन समितीला मुदतवाढ देण्याच्या सरकारच्या निर्णयाला कलमाडी यांचा विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शुंघलू समितीला घोटाळ्याचे सर्व रेकॉर्ड तपासता यावेत आणि आयोजन समितीच्या स्टाफची चौकशी करता यावी यासाठी सरकारने समितीला मुदतवाढ दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2010 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close