S M L

आदर्श घोटाळ्यातील सुभाष लालांची नियुक्ती अवैध - माधव भंडारी

अमेय तिरोडकर, मुंबई 29 डिसेंबरमुख्यमंत्र्यांनी राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य असलेल्या सुभाष लाला यांनी राजीनामा द्यायला सांगितले आहे. पण आता या आयोगावर लालांची झालेली नेमणूकच चुकीच्या पद्धतीनं झाल्याचे समोर आलं आहे. अनेक कायदे मोडून झालेल्या या नेमणुकीमुळेच सुभाष लाला आता सरकारच्या राजीनाम्याच्या सूचनेला किंमत देत नाहीत असा आरोप त्यातून भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूकच झालेली नसताना सुभाष लाला यांची मात्र सदस्यपदी वर्णी लागली. या पदासाठी इतर योग्य व्यक्ती असतानाही सुभाष लाला यांची यापदावर नेमणूक केली गेली. मानवी हक्क आयोगावर सदस्य नेमणार्‍या समितीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्षनेते असतात. 21 सप्टेंबर 2006 ला निवड समितीची बैठक झाली. नियम मोडून लालांची नेमणूक होण्याचा हा एकच मुद्दा नाही. या पदावर नेमणूक होत असताना त्या सदस्याला मानवी हक्कांबद्दलच्या कामाचा अनुभव असावा लागतो. पण, लालांना तोही अनुभव नाही. त्यांच्या कामाचा तपशील दिला गेला. तो फक्त ते मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत हा. हा मुद्दाच लालांच्या नेमणुकीवर गंभीर आक्षेप घ्यायला पुरेसा आहे. लाला हे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सचिव असतानाच्या काळातच त्यांची मानवी हक्क आयोगावर नेमणूक झाली. ही नेमणूक करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीला असतात. मुख्यमंत्र्यांनीच कायदा मोडून ही नेमणूक केली की काय याचाही खुलासा सरकारला करायला हवा. पण यामुळेच लाला पदावरून हटायला आता तयार नाही असा आरोपही माधव भंडारी यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2010 03:28 PM IST

आदर्श घोटाळ्यातील सुभाष लालांची नियुक्ती अवैध - माधव भंडारी

अमेय तिरोडकर, मुंबई

29 डिसेंबर

मुख्यमंत्र्यांनी राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य असलेल्या सुभाष लाला यांनी राजीनामा द्यायला सांगितले आहे. पण आता या आयोगावर लालांची झालेली नेमणूकच चुकीच्या पद्धतीनं झाल्याचे समोर आलं आहे. अनेक कायदे मोडून झालेल्या या नेमणुकीमुळेच सुभाष लाला आता सरकारच्या राजीनाम्याच्या सूचनेला किंमत देत नाहीत असा आरोप त्यातून भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूकच झालेली नसताना सुभाष लाला यांची मात्र सदस्यपदी वर्णी लागली. या पदासाठी इतर योग्य व्यक्ती असतानाही सुभाष लाला यांची यापदावर नेमणूक केली गेली. मानवी हक्क आयोगावर सदस्य नेमणार्‍या समितीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्षनेते असतात. 21 सप्टेंबर 2006 ला निवड समितीची बैठक झाली.

नियम मोडून लालांची नेमणूक होण्याचा हा एकच मुद्दा नाही. या पदावर नेमणूक होत असताना त्या सदस्याला मानवी हक्कांबद्दलच्या कामाचा अनुभव असावा लागतो. पण, लालांना तोही अनुभव नाही. त्यांच्या कामाचा तपशील दिला गेला. तो फक्त ते मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत हा. हा मुद्दाच लालांच्या नेमणुकीवर गंभीर आक्षेप घ्यायला पुरेसा आहे.

लाला हे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सचिव असतानाच्या काळातच त्यांची मानवी हक्क आयोगावर नेमणूक झाली. ही नेमणूक करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीला असतात. मुख्यमंत्र्यांनीच कायदा मोडून ही नेमणूक केली की काय याचाही खुलासा सरकारला करायला हवा. पण यामुळेच लाला पदावरून हटायला आता तयार नाही असा आरोपही माधव भंडारी यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2010 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close