S M L

कृष्णेचं पाणी मिळालं ; अलमट्टीच्या पुराचा धोका

30 डिसेंबरकृष्णा पाणी वाटप लवादान आज आपला निर्णय दिला. महाराष्ट्राच्या वाट्याला कृष्णेचं 666 टीएमसी पाणी येणार आहे. पूर्वीपेक्षा 81 टीएमसी पाणी जास्त मिळालं. पण महाराष्ट्राच्या दृष्टीने धक्कादायक निर्णय म्हणजे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय लवादान घेतला. 2 एप्रिल 2004 मध्ये माजी न्यायमूर्ती ब्रजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली लवादाची या नेमणूक करण्यात आली होती. शेकडो सुनावण्या आणि 100 कोटींपेक्षा जास्त खर्च 43 वर्षांच्या कालावधीनंतर अखेर कृष्णा नदी पाणीवाटपाचा निकाल लागला. राज्यांराज्यांतला नदीच्या पाणीवाटपाचा देशातला हा एक मोठा आणि जुना वाद निदान कागदोपत्री तरी सुटला. हा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने दुसर्‍या कृष्णा पाणी वाद लवादाची स्थापना केली होती. लवादाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या तीन राज्यांत हे पाणी वाटलं.त्यात आंध्रप्रदेशला सर्वाधिक 1001 टीएमसी पाणी मिळालं. कर्नाटकला 911 तर महाराष्ट्राला 666 टीएमसी पाणी मिळालं. प्रत्येकाला पूर्वीपेक्षा अधिक पाणी मिळालंय. आंध्रला सर्वाधिक पाणी मिळालं असलं तरी निकालाचा सर्वाधिक फायदा कर्नाटकला झाला. या निकालाने कर्नाटकला आलमट्टी धरणाची उंची सध्याच्या 519 मीटरवरून 524 मीटरपर्यंत वाढवण्याची परवानगी मिळाली. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशचा त्याला वेगवेगळ्या कारणांवरून विरोध आहे. निर्णयावर मत व्यक्त करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली. लवादाच्या या निर्णयाला विरोध झाला नाही तर संसद या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल. आणि त्याचा आढावा केवळ 2015 मध्येच घेता येईल. जुना वाद गाढून तिन्ही राज्यं पुढं जातात काय हे पाहणं महत्त्वाचं आहे. लवादानं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय दिलाय. त्याचा फटका महाराष्ट्राला बसणार आहे. महाराष्ट्रात कृष्णेकाठची अनेक गाव पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. लवादाच्या निर्णयातला कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाचा. कोल्हापूरपासून 140 तर सांगलीपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर बेळगाव जिल्ह्यात विजापूर आणि बागलकोट तालुक्याच्या सीमेवर अलमट्टी धरण आहे. त्याची सध्याची उंची 519 मीटर आहे पण लवादाने 524 मीटरपर्यंत उंची वाढवण्याची परवानगी दिली. त्यावर महाराष्ट्राने चिंता व्यक्त केली.अलमट्टीची उंची वाढली तर महाराष्ट्रातली किमान 100 गाव कायमची पाण्याखाली जाऊ शकतात. शिरोळ तालुक्यातली नृसिंहवाडीसोबत कृष्णाकाठच्या 25 ते 30 गाव हातकणंगले ते कोल्हापूर्यंतची पंचगंगा नदीकाठची 25 गावं आणि सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळपासून कर्‍हाडपर्यंतची अनेक गावं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. 2005 मध्ये आलेल्या महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली अनेक गावं पाण्याखाली गेली होती. त्याचवेळी अलमट्टी धरणाच्या उंचीचा मुद्दा वादग्रस्त बनला होता. काही झालं तरी उंची वाढू दिली जाणार नाही, असं आश्वासन त्यावेळचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलं होतं. आता लवादाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार काय पाऊल उचलतंय हे बघायचं आहे. कुणाला किती पाणी?राज्य आधी आतामहाराष्ट्र 560 टीएमसी666 टीएमसीकर्नाटक 700 टीएमसी911 टीएमसीआंध्र प्रदेश800 टीएमसी1001 टीएमसी

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2010 06:11 PM IST

कृष्णेचं पाणी मिळालं ; अलमट्टीच्या पुराचा धोका

30 डिसेंबर

कृष्णा पाणी वाटप लवादान आज आपला निर्णय दिला. महाराष्ट्राच्या वाट्याला कृष्णेचं 666 टीएमसी पाणी येणार आहे. पूर्वीपेक्षा 81 टीएमसी पाणी जास्त मिळालं. पण महाराष्ट्राच्या दृष्टीने धक्कादायक निर्णय म्हणजे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय लवादान घेतला. 2 एप्रिल 2004 मध्ये माजी न्यायमूर्ती ब्रजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली लवादाची या नेमणूक करण्यात आली होती.

शेकडो सुनावण्या आणि 100 कोटींपेक्षा जास्त खर्च 43 वर्षांच्या कालावधीनंतर अखेर कृष्णा नदी पाणीवाटपाचा निकाल लागला. राज्यांराज्यांतला नदीच्या पाणीवाटपाचा देशातला हा एक मोठा आणि जुना वाद निदान कागदोपत्री तरी सुटला. हा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने दुसर्‍या कृष्णा पाणी वाद लवादाची स्थापना केली होती. लवादाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या तीन राज्यांत हे पाणी वाटलं.त्यात आंध्रप्रदेशला सर्वाधिक 1001 टीएमसी पाणी मिळालं. कर्नाटकला 911 तर महाराष्ट्राला 666 टीएमसी पाणी मिळालं. प्रत्येकाला पूर्वीपेक्षा अधिक पाणी मिळालंय.

आंध्रला सर्वाधिक पाणी मिळालं असलं तरी निकालाचा सर्वाधिक फायदा कर्नाटकला झाला. या निकालाने कर्नाटकला आलमट्टी धरणाची उंची सध्याच्या 519 मीटरवरून 524 मीटरपर्यंत वाढवण्याची परवानगी मिळाली. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशचा त्याला वेगवेगळ्या कारणांवरून विरोध आहे. निर्णयावर मत व्यक्त करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली. लवादाच्या या निर्णयाला विरोध झाला नाही तर संसद या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल. आणि त्याचा आढावा केवळ 2015 मध्येच घेता येईल. जुना वाद गाढून तिन्ही राज्यं पुढं जातात काय हे पाहणं महत्त्वाचं आहे.

लवादानं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय दिलाय. त्याचा फटका महाराष्ट्राला बसणार आहे. महाराष्ट्रात कृष्णेकाठची अनेक गाव पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. लवादाच्या निर्णयातला कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाचा. कोल्हापूरपासून 140 तर सांगलीपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर बेळगाव जिल्ह्यात विजापूर आणि बागलकोट तालुक्याच्या सीमेवर अलमट्टी धरण आहे. त्याची सध्याची उंची 519 मीटर आहे पण लवादाने 524 मीटरपर्यंत उंची वाढवण्याची परवानगी दिली. त्यावर महाराष्ट्राने चिंता व्यक्त केली.

अलमट्टीची उंची वाढली तर महाराष्ट्रातली किमान 100 गाव कायमची पाण्याखाली जाऊ शकतात. शिरोळ तालुक्यातली नृसिंहवाडीसोबत कृष्णाकाठच्या 25 ते 30 गाव हातकणंगले ते कोल्हापूर्यंतची पंचगंगा नदीकाठची 25 गावं आणि सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळपासून कर्‍हाडपर्यंतची अनेक गावं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. 2005 मध्ये आलेल्या महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली अनेक गावं पाण्याखाली गेली होती. त्याचवेळी अलमट्टी धरणाच्या उंचीचा मुद्दा वादग्रस्त बनला होता. काही झालं तरी उंची वाढू दिली जाणार नाही, असं आश्वासन त्यावेळचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलं होतं. आता लवादाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार काय पाऊल उचलतंय हे बघायचं आहे.

कुणाला किती पाणी?

राज्य आधी आतामहाराष्ट्र 560 टीएमसी666 टीएमसीकर्नाटक 700 टीएमसी911 टीएमसीआंध्र प्रदेश800 टीएमसी1001 टीएमसी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2010 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close