S M L

शाहरुख तुम जिओ हजारो साल...

2 नोव्हेंबर, मुंबई - बॉलिवुडचा बेताज बादशहा शाहरुख खानचा 2 नोव्हेंबर हा जन्मदिवस. शाहरुख43 वर्षांचा झाला आहे. कितीही नवे आर्टिस्ट आले तरी वयाची 40 गाठलेल्या शाहरूखचं नंबर वनचं स्थान आजही तसंच राहिलं आहे. याचं श्रेय जातं ते त्याच्या अभिनयाला. त्यामुळेच शाहरुखचे अनेक सिनेमा लोकप्रिय होत आहे. शाहरुखच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला तो अभिनय सम्राट दिलीप कुमार यांच्या अभिनयाची कॉपी मारतो असेही आरोप त्याच्यावर झाले. पण त्याकडे दुर्लक्ष करून शाहरुखने स्वत:च्या अभिनयाची कुवत सिद्ध केली. त्याने आतापर्यंत नायक, खलनायक, रोमॅण्टीक हिरो, चॉकलेट बॉय असा निरनिराळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वयोगटातल्या भूमिका केल्या आहेत.नुसत्या केल्या नाही तर त्या लोकांच्या स्मरणातही आहेत. शाहरुख खानची रोमँटिक हिरोची इमेज लोकांना नेहमीच आवडत राहिली. त्यामुळे त्याचा प्रत्येक सिनेमा हिट झाला. आपण वेगळ्या प्रकारचे अभिनय उत्तमरित्या करू शकतो हे त्याने 'स्वदेश', 'कल हो ना हो' या सिनेमांतून सिद्ध केलं आहे. वेगळ्या पठडीच्या सिनेमांमधून काम करताना तो फक्त त्याच प्रतिमेत अडकून राहिला नाही. त्यामुळे लोकांनी फिलॉसॉफर शाहरूखही लोकांनी डोक्यावर घेतला आहे. तो उत्तम नाचतोही. बेभान नाचणा-या शाहरूखबरोबर प्रेक्षकही ठेका धरतात. शाहरूख खान फक्त शहरी राहिला नाही, त्याचं ऐतिहासिक भूमिकेतलं रूपही प्रेक्षकांना आपलं वाटलं. अभिनयाच्या विविध पैलूंनी बॉलिवूडचा किंग बनलेल्या शाहरूखला आयबीएन लोकमतच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2008 06:22 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2008 06:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close