S M L

2011 चं जल्लोषात स्वागत

01 जानेवारी 2010 ला निरोप देत 21 व्या शतकाचं पहिलं दशक संपवून नव्या दशकात प्रवेश केला आहे. नव्या वर्षात पदार्पण करत सर्वत्र उत्साह आनंद ओसाडून वाहत आहे. ठिकठिकाणी एकमेकांना हॅपी न्यू इयर म्हणतं आनंद साजरा केला जात आहे. तर गत वर्षात झाले घोटाळे, महागाई आणि जागोजागी मिळालेल्या भ्रष्टाचाराला निरोप देत येणार वर्ष सुखासमाधानात जावो अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. मुंबई आणि गोव्यातल्या बीच देशी तसेच परदेशी पर्यटकांचीही मोठी गर्दीने फूलली आहे. तरुणाईचा उत्साह, रॉक संगीतावर डोलणारे ग्रुप नव्या जुन्याचा होणारा मिलाफआणि त्यातच जल्लोषात आवाज येणार हॅपी न्यू इयर. सगळीकडे नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं आहे सरत्या वर्षाला अखेरचा निरोप देताना रात्रीच्या जल्लोषात नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी पाटर्‌यांचं आयोजन करण्यात आलं आहे. जगात सगळ्यात पहिल्यांदा नव वर्षाचं स्वागत होतं ते न्यूझीलंडमध्ये. मोठ्या जल्लोषात तिथं 2011 चं स्वागत करण्यात आलं. विविध रंगाच्या फटाक्यांच्या आतषबाजीत न्यूझीलंडचं आकाश झाकोळून गेलं होतं. तर दूसरीकडे ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्येही 2011 चं जल्लोषात स्वागत झालं. मध्यरात्र झाली तशी डोळे डिपवून टाकणारी आतषबाजी सुरू झाली. आतषबाजीनं आकाशात 12 मिनिटांचे इंद्रधनुष्य तयार करण्यात आले. सिडनीतलं बॉटॅनिक गार्डन, सिडनी ऑपेरा हाऊस, आणि सर्क्युलर क्वे याठिकाणी लोकांची मोठी गर्दी झाली होती. अँबी व्हॅलीत मुन्नीचं आकर्षणलोणावळ्याजवळच्या अँबी व्हॅलीत नववर्षाच्या स्वागतासाठी एका ग्रॅन्ड पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. या पार्टीचे मुख्य आकर्षण म्हणजे मुन्नी फेम मलायका अरोराचा डान्स प्रोग्राम आणि संगीत दिग्दर्शक विशाल-शेखर यांच्या उडत्या चाली. या ग्रॅन्ड पार्टीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 40 प्रकारचा जेवणाचा मेन्यु आणि जगभरातली प्रत्येक मद्य इथं मिळतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2010 06:30 PM IST

2011 चं जल्लोषात स्वागत

01 जानेवारी

2010 ला निरोप देत 21 व्या शतकाचं पहिलं दशक संपवून नव्या दशकात प्रवेश केला आहे. नव्या वर्षात पदार्पण करत सर्वत्र उत्साह आनंद ओसाडून वाहत आहे. ठिकठिकाणी एकमेकांना हॅपी न्यू इयर म्हणतं आनंद साजरा केला जात आहे. तर गत वर्षात झाले घोटाळे, महागाई आणि जागोजागी मिळालेल्या भ्रष्टाचाराला निरोप देत येणार वर्ष सुखासमाधानात जावो अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.

मुंबई आणि गोव्यातल्या बीच देशी तसेच परदेशी पर्यटकांचीही मोठी गर्दीने फूलली आहे. तरुणाईचा उत्साह, रॉक संगीतावर डोलणारे ग्रुप नव्या जुन्याचा होणारा मिलाफआणि त्यातच जल्लोषात आवाज येणार हॅपी न्यू इयर. सगळीकडे नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं आहे सरत्या वर्षाला अखेरचा निरोप देताना रात्रीच्या जल्लोषात नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी पाटर्‌यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

जगात सगळ्यात पहिल्यांदा नव वर्षाचं स्वागत होतं ते न्यूझीलंडमध्ये. मोठ्या जल्लोषात तिथं 2011 चं स्वागत करण्यात आलं. विविध रंगाच्या फटाक्यांच्या आतषबाजीत न्यूझीलंडचं आकाश झाकोळून गेलं होतं. तर दूसरीकडे ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्येही 2011 चं जल्लोषात स्वागत झालं. मध्यरात्र झाली तशी डोळे डिपवून टाकणारी आतषबाजी सुरू झाली. आतषबाजीनं आकाशात 12 मिनिटांचे इंद्रधनुष्य तयार करण्यात आले. सिडनीतलं बॉटॅनिक गार्डन, सिडनी ऑपेरा हाऊस, आणि सर्क्युलर क्वे याठिकाणी लोकांची मोठी गर्दी झाली होती.

अँबी व्हॅलीत मुन्नीचं आकर्षण

लोणावळ्याजवळच्या अँबी व्हॅलीत नववर्षाच्या स्वागतासाठी एका ग्रॅन्ड पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. या पार्टीचे मुख्य आकर्षण म्हणजे मुन्नी फेम मलायका अरोराचा डान्स प्रोग्राम आणि संगीत दिग्दर्शक विशाल-शेखर यांच्या उडत्या चाली. या ग्रॅन्ड पार्टीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 40 प्रकारचा जेवणाचा मेन्यु आणि जगभरातली प्रत्येक मद्य इथं मिळतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2010 06:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close