S M L

अशोक चव्हाणांसह 15 आरोपींची एफआयआर तयार

03 जानेवारीआदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने पंधरा आरोपींची यादी तयार केली आहे. या यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचासह सनदी अधिकार्‍यांचा सहभाग आहे. या प्रकरणी सीबीआय जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. संरक्षण खात्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारावर एफआयआर दाखल केली जाऊ शकते. सीबीआयने दोन आठवड्यांपूर्वीच 18 जणांविरुद्ध रिपोर्ट तयार केला होता. पण त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव असल्याने एफआयआर दाखल करु नये यासाठी सीबीआयवर दबाव येत होता. मात्र आज दिल्लीतून याप्रकरणी हालचालीना वेग आला. दरम्यान काही वेळापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यापालांची भेट घेतली. सीबीआयाचं आरोप पत्रआदर्शचे प्रमोटर्स- आर.सी. ठाकूर ब्रिगेडियर एम.एम.वांछूकन्हैय्यालाल गिडवाणी मुख्य आरोपी कारस्थान रचल्याचा आरोपमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणमेजर जनरल निवृत्त ए.आर.कुमारब्रिगेडियर निवृत्त रमेशचंद्र शर्मा यांनाही आरोपी करणारआरोपींमध्ये प्रदीप व्यासआय.ए.कुंदनरामानंद तिवारीसुभाष लालपी.व्ही देशमुखजयराज फाटक यांचा समावेशभ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 आणि कलम 13 (1) डी या खाली आरोपींवर कारवाई होणार. सरकारी पदाचा गैरवापर केल्याचा आरोपयाशिवाय आरोपींवर कलम 420 (फसवणूक), कलम 468 फसवण्यासाठी कागदपत्रात फेरफार, कलम 471 आणि कलम 120 बी (कटकारस्थान रचणं यानुसार कारवाई)लेफ्टनंट जनरल (निवृत्त) तेजींदर सिंग, ले.ज.(निवृत्त) गुरूबक्ष सिंग सिहोटा मेजर जनरल (निवृत्त) टी.के. कौल, कर्नल टी.के.सिन्हा यांच्या विरुद्धही एफआयआर दाखल होणार या चारही लष्करी अधिकार्‍यांनी आदर्श प्रकरणी संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप.आर.सी. ठाकूर यांनी इतरांशी संगनमत करुन कारगिलच्या हौतात्म्याचा फायदा उठवला असं एफआयआरमध्ये नमूद. फाईल्स पास करुन घेण्यासाठी हा भावनात्मक मुद्दा वापरण्यात आला. जनरल दीपक कपूर आणि जनरल एन.सी विज यांचीही मालमत्तेसंदर्भात सीबीआयकडून चौकशी होणारआदर्शच्या सर्वच्या सर्व 103 सदस्यांना सीबीआय प्रश्न विचारणार आणि खटले दाखल करणार या एफआरआयला सीबीआय संचालकांच्या अंतिम मंजुरीची गरज आहे ती अजून मिळालेली नाही जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात ही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2011 11:18 AM IST

अशोक चव्हाणांसह 15 आरोपींची एफआयआर तयार

03 जानेवारी

आदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने पंधरा आरोपींची यादी तयार केली आहे. या यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचासह सनदी अधिकार्‍यांचा सहभाग आहे. या प्रकरणी सीबीआय जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. संरक्षण खात्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारावर एफआयआर दाखल केली जाऊ शकते.

सीबीआयने दोन आठवड्यांपूर्वीच 18 जणांविरुद्ध रिपोर्ट तयार केला होता. पण त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव असल्याने एफआयआर दाखल करु नये यासाठी सीबीआयवर दबाव येत होता. मात्र आज दिल्लीतून याप्रकरणी हालचालीना वेग आला. दरम्यान काही वेळापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यापालांची भेट घेतली.

सीबीआयाचं आरोप पत्र

आदर्शचे प्रमोटर्स- आर.सी. ठाकूर ब्रिगेडियर एम.एम.वांछूकन्हैय्यालाल गिडवाणी मुख्य आरोपी कारस्थान रचल्याचा आरोपमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणमेजर जनरल निवृत्त ए.आर.कुमार

ब्रिगेडियर निवृत्त रमेशचंद्र शर्मा यांनाही आरोपी करणार

आरोपींमध्ये प्रदीप व्यासआय.ए.कुंदनरामानंद तिवारीसुभाष लालपी.व्ही देशमुखजयराज फाटक यांचा समावेश

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 आणि कलम 13 (1) डी या खाली आरोपींवर कारवाई होणार. सरकारी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

याशिवाय आरोपींवर कलम 420 (फसवणूक), कलम 468 फसवण्यासाठी कागदपत्रात फेरफार, कलम 471 आणि कलम 120 बी (कटकारस्थान रचणं यानुसार कारवाई)

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) तेजींदर सिंग, ले.ज.(निवृत्त) गुरूबक्ष सिंग सिहोटा मेजर जनरल (निवृत्त) टी.के. कौल, कर्नल टी.के.सिन्हा यांच्या विरुद्धही एफआयआर दाखल होणार या चारही लष्करी अधिकार्‍यांनी आदर्श प्रकरणी संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप.

आर.सी. ठाकूर यांनी इतरांशी संगनमत करुन कारगिलच्या हौतात्म्याचा फायदा उठवला असं एफआयआरमध्ये नमूद. फाईल्स पास करुन घेण्यासाठी हा भावनात्मक मुद्दा वापरण्यात आला.

जनरल दीपक कपूर आणि जनरल एन.सी विज यांचीही मालमत्तेसंदर्भात सीबीआयकडून चौकशी होणारआदर्शच्या सर्वच्या सर्व 103 सदस्यांना सीबीआय प्रश्न विचारणार आणि खटले दाखल करणार

या एफआरआयला सीबीआय संचालकांच्या अंतिम मंजुरीची गरज आहे ती अजून मिळालेली नाही जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात ही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2011 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close