S M L

आरूषी केस बंद करण्याची घाई का ? कोर्टाचा सीबीआयला सवाल

03 जानेवारीआरूषी तलवार केस बंद करण्याची इतकी घाई का करण्यात आली. कोर्ट सुटीनंतर पुन्हा सुरू होईपर्यंत सीबीआयने धीर का धरला नाही असा सवाल गाझियाबाद कोर्टाने सीबीआय ला विचारला. सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवर आज कोर्टाने आपलं मत व्यक्त केलं. याविषयीचा निर्णयमात्र कोर्टानं पुढे ढकलला. ही केस बंद होणार का या केसची पुन्हा तपासणी होणार याविषयीच्या निर्णयासाठी आता कोर्ट नवीन तारीख जाहीर करणार आहे. सीबीआयच्या या रिपोर्टनुसार आरूषीच्या हत्येमागील उद्दिष्ट अजूनही स्पष्ट होऊ शकत नाही आणि ज्या हत्याराने खून झाला त्याचाही तपास लागलेला नाही त्यामुळे यापुढचा तपास होणं शक्य नाही असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या क्लोजर रिपोर्टने कोर्टाचे समाधान झालं नाही तर कोर्ट सीबीआयला ला ही केस रि-ओपन करून त्याचा पुन्हा तपास करण्याचे आदेश देऊ शकतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2011 01:39 PM IST

आरूषी केस बंद करण्याची घाई का ? कोर्टाचा सीबीआयला सवाल

03 जानेवारी

आरूषी तलवार केस बंद करण्याची इतकी घाई का करण्यात आली. कोर्ट सुटीनंतर पुन्हा सुरू होईपर्यंत सीबीआयने धीर का धरला नाही असा सवाल गाझियाबाद कोर्टाने सीबीआय ला विचारला. सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवर आज कोर्टाने आपलं मत व्यक्त केलं. याविषयीचा निर्णयमात्र कोर्टानं पुढे ढकलला. ही केस बंद होणार का या केसची पुन्हा तपासणी होणार याविषयीच्या निर्णयासाठी आता कोर्ट नवीन तारीख जाहीर करणार आहे. सीबीआयच्या या रिपोर्टनुसार आरूषीच्या हत्येमागील उद्दिष्ट अजूनही स्पष्ट होऊ शकत नाही आणि ज्या हत्याराने खून झाला त्याचाही तपास लागलेला नाही त्यामुळे यापुढचा तपास होणं शक्य नाही असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या क्लोजर रिपोर्टने कोर्टाचे समाधान झालं नाही तर कोर्ट सीबीआयला ला ही केस रि-ओपन करून त्याचा पुन्हा तपास करण्याचे आदेश देऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2011 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close