S M L

माळेगावच्या यात्रेत 'उधारी' गाढवांचा बाजार !

04 जानेवारीएटीएम आणि क्रेडीट कार्डच्या जमान्यात आजही उधारीवर व्यवहार केला जातो. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेत असे अनेक आश्चर्यचकित करून टाकणारे व्यवहार केले जातात.अनेक रुढी आणि परंपरांनी नटलेल्या या यात्रेचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथला उधारी गाढव बाजार. देशी, गावरान, जंगली आणि काठेवाडे, लसण्या या पाच जातींच्या गाढवांची इथं जोरदार खरेदी - विक्री सुरू आहे. पाच हजार रुपयांपासून ते चाळीस हजार रुपयांपर्यंतचा गाढवांचा हा बाजार चालतो तो मात्र उधारीवर. या यात्रेतील पैसे पुढच्या यात्रेत देण्यात येतात.आणि ही परंपरा गेल्या 25 वर्षांपासून अविरत सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2011 07:36 AM IST

माळेगावच्या यात्रेत 'उधारी' गाढवांचा बाजार !

04 जानेवारी

एटीएम आणि क्रेडीट कार्डच्या जमान्यात आजही उधारीवर व्यवहार केला जातो. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेत असे अनेक आश्चर्यचकित करून टाकणारे व्यवहार केले जातात.अनेक रुढी आणि परंपरांनी नटलेल्या या यात्रेचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथला उधारी गाढव बाजार. देशी, गावरान, जंगली आणि काठेवाडे, लसण्या या पाच जातींच्या गाढवांची इथं जोरदार खरेदी - विक्री सुरू आहे. पाच हजार रुपयांपासून ते चाळीस हजार रुपयांपर्यंतचा गाढवांचा हा बाजार चालतो तो मात्र उधारीवर. या यात्रेतील पैसे पुढच्या यात्रेत देण्यात येतात.आणि ही परंपरा गेल्या 25 वर्षांपासून अविरत सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2011 07:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close