S M L

उत्तर भारतात थंडीचे 12 बळी

06 जानेवारीउत्तर भारतात थंडीचा कडाका आणखी वाढला. कडाक्याच्या थंडीमुळे उत्तर प्रदेशात आणखी 12 जणांचा बळी गेला. थंडीच्या बळींची संख्या आता 48 झाली आहे. लखनऊमध्ये काल 5 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. वाढत्या थंडीमुळे शाळांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातही गेल्या 50 वर्षातल्या सर्वाधिक थंडीची नोंद झाली. त्यामुळं इथं शाळांना 16 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली. वाढत्या थंडीमुळे दिल्लीतल्या शाळांनाही 10 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली. दिल्लीमध्ये आज 6 डिग्री तापमानाची नोंद झाली. सध्या धुकं नसल्यानं विमानसेवा आणि इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे.तर पंजाब आणि हरियाणामध्ये तापमान आणखी कमी होतं. चंदीगढमध्ये 5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 01:44 PM IST

उत्तर भारतात थंडीचे 12 बळी

06 जानेवारी

उत्तर भारतात थंडीचा कडाका आणखी वाढला. कडाक्याच्या थंडीमुळे उत्तर प्रदेशात आणखी 12 जणांचा बळी गेला. थंडीच्या बळींची संख्या आता 48 झाली आहे. लखनऊमध्ये काल 5 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. वाढत्या थंडीमुळे शाळांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातही गेल्या 50 वर्षातल्या सर्वाधिक थंडीची नोंद झाली. त्यामुळं इथं शाळांना 16 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली. वाढत्या थंडीमुळे दिल्लीतल्या शाळांनाही 10 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली. दिल्लीमध्ये आज 6 डिग्री तापमानाची नोंद झाली. सध्या धुकं नसल्यानं विमानसेवा आणि इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे.तर पंजाब आणि हरियाणामध्ये तापमान आणखी कमी होतं. चंदीगढमध्ये 5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 01:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close