S M L

कांदा व्यापार्‍यांवर इन्कमटॅक्सचे छापे

07 जानेवारीदेशभरातल्या कांदा व्यापार्‍यांवर इन्कमटॅक्सनं छापे घातले आहेत. महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव इथंही छापे घालण्यात आले आहेत. कांद्याचे भाव वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली. जादा साठा करणार्‍यांवरची कारवाई सरकारनं आता जलदगतीनं करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान देशभरातही कांद्या व्यापार्‍यांवर इन्कमटॅक्स विभागानं छापे टाकले आहेत. कानपूर, लखनऊ, कोलकता इथं इन्कमटॅक्सनं छापे घालून कारवाई केली.दरम्यान भारताला करण्यात येणारी कांद्याची निर्यात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. परराष्ट्रमंत्री एस एम कृष्णा यांनी ही माहिती दिली. हा कांदा रेल्वे आणि समुद्रमार्गाने निर्यात करण्यात येईल. भारताला करण्यात येत असलेली कांद्याची निर्यात थांबवण्याचा निर्णय पाकिस्तानने दोन दिवसांपूर्वी घेतला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2011 09:51 AM IST

कांदा व्यापार्‍यांवर इन्कमटॅक्सचे छापे

07 जानेवारी

देशभरातल्या कांदा व्यापार्‍यांवर इन्कमटॅक्सनं छापे घातले आहेत. महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव इथंही छापे घालण्यात आले आहेत. कांद्याचे भाव वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली. जादा साठा करणार्‍यांवरची कारवाई सरकारनं आता जलदगतीनं करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान देशभरातही कांद्या व्यापार्‍यांवर इन्कमटॅक्स विभागानं छापे टाकले आहेत. कानपूर, लखनऊ, कोलकता इथं इन्कमटॅक्सनं छापे घालून कारवाई केली.

दरम्यान भारताला करण्यात येणारी कांद्याची निर्यात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. परराष्ट्रमंत्री एस एम कृष्णा यांनी ही माहिती दिली. हा कांदा रेल्वे आणि समुद्रमार्गाने निर्यात करण्यात येईल. भारताला करण्यात येत असलेली कांद्याची निर्यात थांबवण्याचा निर्णय पाकिस्तानने दोन दिवसांपूर्वी घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2011 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close