S M L

आरुषी हत्याकांड प्रकरणी पुढील सुनावणी 21 जानेवारीला

07 जानेवारीआरुषी तलवार हत्याकांड प्रकरणी गाझियाबाद न्यायालयात आजची सुनावणी पूर्ण झाली पुढची सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे. दरम्यान कोर्टानं तलवार दांपत्याला क्लोजर रिपोर्ट देण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. त्यानुसार सीबीआयनं तलवार दांपत्याला हे रिपोर्ट दिले आहेत. त्याआधी सीबीआयनं कोर्टासमोर तलवार दाम्पत्यच दोषी असल्याचा पुनरूच्चार सीबीआयनं केला. तक्रार करणारे आणि आरोपी एकच आहे असंही सीबीआयनं म्हटलं आहे.नोएडा पोलिस आणि त्यानंतर सीबीआयनं असा एकूण अडीच वर्ष या प्रकरणाचा तपास केला. पण हत्याकांडाचा तपास लावण्यात अपयश आलं. पुरावे नष्ट झाल्यामुळे सीबीआयनं केसचा तपास बंद केला. हा तपास पुन्हा सुरु करुन न्याय द्यावा यासाठी आरुषीचे वडील राजेश तलवार यांनी याचिका केली. पण मुख्य संशयित म्हणून सीबीआयनं राजेश तलवार यांचं नाव घेतलं. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण लागलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2011 10:22 AM IST

आरुषी हत्याकांड प्रकरणी पुढील सुनावणी 21 जानेवारीला

07 जानेवारी

आरुषी तलवार हत्याकांड प्रकरणी गाझियाबाद न्यायालयात आजची सुनावणी पूर्ण झाली पुढची सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे. दरम्यान कोर्टानं तलवार दांपत्याला क्लोजर रिपोर्ट देण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. त्यानुसार सीबीआयनं तलवार दांपत्याला हे रिपोर्ट दिले आहेत. त्याआधी सीबीआयनं कोर्टासमोर तलवार दाम्पत्यच दोषी असल्याचा पुनरूच्चार सीबीआयनं केला. तक्रार करणारे आणि आरोपी एकच आहे असंही सीबीआयनं म्हटलं आहे.

नोएडा पोलिस आणि त्यानंतर सीबीआयनं असा एकूण अडीच वर्ष या प्रकरणाचा तपास केला. पण हत्याकांडाचा तपास लावण्यात अपयश आलं. पुरावे नष्ट झाल्यामुळे सीबीआयनं केसचा तपास बंद केला. हा तपास पुन्हा सुरु करुन न्याय द्यावा यासाठी आरुषीचे वडील राजेश तलवार यांनी याचिका केली. पण मुख्य संशयित म्हणून सीबीआयनं राजेश तलवार यांचं नाव घेतलं. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2011 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close