S M L

आयपीएल सिझन चारसाठी खेळाडूंचा लिलाव 8 आणि 9 तारखेला

07 जानेवारीआयपीएलच्या चौथ्या हंगामासाठी 8 आणि 9 जानेवारीला बंगलोरमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे आणि यात परदेशी खेळाडूंवरच सर्वात जास्त बोली लागण्याची शक्यता आहे. या लिलावात तब्बल साडेतीनशेहून अधिक क्रिकेटपटू सहभागी होतील. त्यात भारताच्या 49 क्रिकेटपटूंवर बोली लागणार आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंसाठी सर्वांत जास्त चुरस आहे. गेल्या तीन आयपीएलप्रमाणेच यंदाही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाच मोठी मागणी असणार आहे. कारण लिलावाच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे सर्वात जास्त म्हणजे 74 क्रिकेटपटू मैदानात आहेत.ऍडम गिलख्रिस्ट, अँन्ड्‌य्रु सायमंड, ब्रेट ली आणि डर्क नॅनेस हे क्रिकेटर्स यावेळी लिलावात सहभागी असतील. पण ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉटींग आणि मायकेल क्लार्कचा मात्र या यादीत समावेश नाही. भारताच्या केवळ चार खेळाडूंचीच मूळ किंमत 4 लाख डॉलर्स ठेवण्यात आली. इंग्लंडकडुन जेम्स अँडरसन, केवीन पीटरसन श्रीलंकेचा महेला जयवर्धने, दिलशान तिलकरत्ने, वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, न्युझीलंडचा डॅनियल व्हेटोरी, ब्रँडन मॅक्क्युलम तसेच रॉस टेलर हे प्रमुख क्रिकेटर्स लिलावाचं आकर्षण ठरतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2011 10:51 AM IST

आयपीएल सिझन चारसाठी खेळाडूंचा लिलाव 8 आणि 9 तारखेला

07 जानेवारी

आयपीएलच्या चौथ्या हंगामासाठी 8 आणि 9 जानेवारीला बंगलोरमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे आणि यात परदेशी खेळाडूंवरच सर्वात जास्त बोली लागण्याची शक्यता आहे. या लिलावात तब्बल साडेतीनशेहून अधिक क्रिकेटपटू सहभागी होतील. त्यात भारताच्या 49 क्रिकेटपटूंवर बोली लागणार आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंसाठी सर्वांत जास्त चुरस आहे. गेल्या तीन आयपीएलप्रमाणेच यंदाही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाच मोठी मागणी असणार आहे. कारण लिलावाच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे सर्वात जास्त म्हणजे 74 क्रिकेटपटू मैदानात आहेत.ऍडम गिलख्रिस्ट, अँन्ड्‌य्रु सायमंड, ब्रेट ली आणि डर्क नॅनेस हे क्रिकेटर्स यावेळी लिलावात सहभागी असतील. पण ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉटींग आणि मायकेल क्लार्कचा मात्र या यादीत समावेश नाही. भारताच्या केवळ चार खेळाडूंचीच मूळ किंमत 4 लाख डॉलर्स ठेवण्यात आली. इंग्लंडकडुन जेम्स अँडरसन, केवीन पीटरसन श्रीलंकेचा महेला जयवर्धने, दिलशान तिलकरत्ने, वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, न्युझीलंडचा डॅनियल व्हेटोरी, ब्रँडन मॅक्क्युलम तसेच रॉस टेलर हे प्रमुख क्रिकेटर्स लिलावाचं आकर्षण ठरतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2011 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close