S M L

मनमाडमध्ये कांदा लिलाव बुधवारपर्यंत बंद

08 जानेवारीकांदा व्यापार्‍यांवर आयकर विभागानं टाकलेल्या धाडींचा नाशिकमधल्या घाऊक बाजारावर फारसा परिणाम झाला नाही. या धाडीच्या निषेधार्थ मनमाडच्या व्यापार्‍यांनी बुधवारपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे लासलगाव आणि नांदगाव मार्केट बंद राहणार आहे. तर काल बाजार बंद होताना कांद्याचा दर सरासरी 40 रुपये किलो होता. याच दरानं कांद्याची घाऊक खरेदी सुरु आहे. देशभरात कांद्याच्या साठ्यांवर काल धाडी टाकण्यात आल्या त्यामुळे कांद्याच्या दरात आज 5 ते 10 रुपयांची घसरण झाली. चेन्नईमध्ये कांद्याचा दर 65 रुपये किलो होता. पण आज हा दर 50 रुपये झाला. मुंबई आणि दिल्लीतही हीच परिस्थिती आहे. तसंच गुजरातमधून मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध झाला. त्यामुळे किंमती आणखी उतरण्याची शक्यता आहे. मोठ्या शहरात कांद्याचे दर 60 रुपयांवर स्थिर झाल्याचं चित्र आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2011 09:33 AM IST

मनमाडमध्ये कांदा लिलाव बुधवारपर्यंत बंद

08 जानेवारी

कांदा व्यापार्‍यांवर आयकर विभागानं टाकलेल्या धाडींचा नाशिकमधल्या घाऊक बाजारावर फारसा परिणाम झाला नाही. या धाडीच्या निषेधार्थ मनमाडच्या व्यापार्‍यांनी बुधवारपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे लासलगाव आणि नांदगाव मार्केट बंद राहणार आहे. तर काल बाजार बंद होताना कांद्याचा दर सरासरी 40 रुपये किलो होता. याच दरानं कांद्याची घाऊक खरेदी सुरु आहे.

देशभरात कांद्याच्या साठ्यांवर काल धाडी टाकण्यात आल्या त्यामुळे कांद्याच्या दरात आज 5 ते 10 रुपयांची घसरण झाली. चेन्नईमध्ये कांद्याचा दर 65 रुपये किलो होता. पण आज हा दर 50 रुपये झाला. मुंबई आणि दिल्लीतही हीच परिस्थिती आहे. तसंच गुजरातमधून मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध झाला. त्यामुळे किंमती आणखी उतरण्याची शक्यता आहे. मोठ्या शहरात कांद्याचे दर 60 रुपयांवर स्थिर झाल्याचं चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2011 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close