S M L

एकनाथ खडसेंचं सुरेश जैन यांना आव्हान

10 जानेवारीजळगावमध्ये शिवसेना आणि भाजपमधला वाद आता आणखी चिघळतोय. शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर चांगलीच तोफ डागली होती. त्याला खडसेंनी ही चांगलचं उत्तर दिलं होतं. जळगावच्या विधानपरिषद निवडणुकीत सुरेश जैन यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचा युतीला मदत करण्याचा आदेश मानला नाही. त्यांनी स्वत:ची जैन सेना निर्माण केली आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत करुन जैन यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. हिंमत असेल तर सुरेश जैन यांनी जळगावची शिवसेनेकडची जागा भाजपला द्यावी. मी ती जागा जिंकून आणीन असा प्रतिहल्ला विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2011 08:17 AM IST

एकनाथ खडसेंचं सुरेश जैन यांना आव्हान

10 जानेवारी

जळगावमध्ये शिवसेना आणि भाजपमधला वाद आता आणखी चिघळतोय. शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर चांगलीच तोफ डागली होती. त्याला खडसेंनी ही चांगलचं उत्तर दिलं होतं. जळगावच्या विधानपरिषद निवडणुकीत सुरेश जैन यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचा युतीला मदत करण्याचा आदेश मानला नाही. त्यांनी स्वत:ची जैन सेना निर्माण केली आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत करुन जैन यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. हिंमत असेल तर सुरेश जैन यांनी जळगावची शिवसेनेकडची जागा भाजपला द्यावी. मी ती जागा जिंकून आणीन असा प्रतिहल्ला विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2011 08:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close