S M L

जैतापूर प्रकल्प निषेधार्थ शाळांवर बहिष्कार

10 जानेवारीजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या निषेधार्थ जैतापूर आणि आसपासच्या 20 गावातील पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळांवर आजपासून दोन दिवसांचा बहिष्कार घातला. रत्नागिरीच्या प्रांताधिकार्‍यांनी शिक्षकांना बोलावून विद्यार्थ्याना प्रकल्पाची माहिती द्या आणि त्यांच्याकडून प्रकल्पाचा प्रचार करुन घ्या असे आदेश दिल्यानं जैतापूर परिसरात संतापाची लाट उसळली. माडबन, जानशी, मिठगवाणे, करेल, निवेली, कुवेशी, दळे, तुळसुंदे आणि जैतापूर परिसरातल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बहिष्काराचं हे सत्र आणखी आठवडाभर चालणार असल्याचं समजतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2011 03:10 PM IST

जैतापूर प्रकल्प निषेधार्थ शाळांवर बहिष्कार

10 जानेवारी

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या निषेधार्थ जैतापूर आणि आसपासच्या 20 गावातील पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळांवर आजपासून दोन दिवसांचा बहिष्कार घातला. रत्नागिरीच्या प्रांताधिकार्‍यांनी शिक्षकांना बोलावून विद्यार्थ्याना प्रकल्पाची माहिती द्या आणि त्यांच्याकडून प्रकल्पाचा प्रचार करुन घ्या असे आदेश दिल्यानं जैतापूर परिसरात संतापाची लाट उसळली. माडबन, जानशी, मिठगवाणे, करेल, निवेली, कुवेशी, दळे, तुळसुंदे आणि जैतापूर परिसरातल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बहिष्काराचं हे सत्र आणखी आठवडाभर चालणार असल्याचं समजतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2011 03:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close