S M L

संघात कट्टरवादी होते - भागवत

10 जानेवारीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध दहशतावादाशी जोडून काँग्रेस त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. पण त्याचबरोबर संघात काही कट्टरवादी लोक होते पण सध्या ते संघात नसल्याचंही म्हटलं आहे. तर गृहमंत्री आर आर पाटील यांनी मालेगाव बॉम्बस्फोटांची नव्यानं सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. हिंदुत्ववादी संघटनांचे अतिरेकी कारवायांशी असलेल्या संबंधांच्या चौकशीचे आदेशही एटीएसला देण्यात आलेत. समझौता बॉम्बस्फोटात हात होता या स्वामी असिमानंद याच्या कबुलीनंतर संघ बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. संघात काही मूलतत्तवादी होते पण दहशतवादी हल्ले उजेडात येण्यापूर्वीच ते संघाबाहेर गेले अशी कबुली सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. काँग्रेस जाणूनबुजून संघाचे संबंध दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.असिमानंद याच्या कबुलीजबाबामुळे बॉम्बस्फोटांच्या तपासाला नवी दिशा देणारी माहिती समोर आली. त्यामुळेच आता मालेगाव बॉम्बस्फोटाची नव्यानं चौकशी करावी अशी विनंती राज्य सरकार सीबीआयकडे करणार आहे. हिंदुत्ववादी सघटनांच्या कार्यप्रणालीची माहिती सरकारकडे सादर करण्याचे आदेश एटीएसला दिले असल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. असिमानंद याच्या कबुलीजबाबानंतर संघाच्या काही नेत्यांचे देशभरातल्या बॉम्बस्फोटांशी कसे संबंध आहेत यावर प्रकाश पडला. त्यामुळेच आता देशभरातल्या बॉम्बस्फोटप्रकरणांच्या तपासाला वेगळी दिशा मिळू शकते.दरम्यान असिमानंद यांच्या कबुलीमुळे बॉम्बस्फोट आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या संबंधांवर चर्चा सुरू झाली. यामुळे मालेगाव स्फोटासंबंधी पकडलेल्या संशयितांच्या कुटुंबियांनी त्यांच्या सुटकेची मागणी केली. मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी निर्दोष असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला. तसेच मालेगाव स्फोटातले संशयित निर्दोष असतील तर त्यांची सुटका करण्यात यावी आणि त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.तर असिमानंद याच्या कबुलीजबाबाची दखल पाकिस्ताननंही घेतली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं इस्लामाबादमधल्या भारतीय राजदुताला बोलावून घेतलं. आणि 2007 मधल्या समझौता बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाची माहिती द्यावी अशी मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2011 04:59 PM IST

संघात कट्टरवादी होते - भागवत

10 जानेवारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध दहशतावादाशी जोडून काँग्रेस त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. पण त्याचबरोबर संघात काही कट्टरवादी लोक होते पण सध्या ते संघात नसल्याचंही म्हटलं आहे. तर गृहमंत्री आर आर पाटील यांनी मालेगाव बॉम्बस्फोटांची नव्यानं सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. हिंदुत्ववादी संघटनांचे अतिरेकी कारवायांशी असलेल्या संबंधांच्या चौकशीचे आदेशही एटीएसला देण्यात आलेत.

समझौता बॉम्बस्फोटात हात होता या स्वामी असिमानंद याच्या कबुलीनंतर संघ बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. संघात काही मूलतत्तवादी होते पण दहशतवादी हल्ले उजेडात येण्यापूर्वीच ते संघाबाहेर गेले अशी कबुली सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. काँग्रेस जाणूनबुजून संघाचे संबंध दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

असिमानंद याच्या कबुलीजबाबामुळे बॉम्बस्फोटांच्या तपासाला नवी दिशा देणारी माहिती समोर आली. त्यामुळेच आता मालेगाव बॉम्बस्फोटाची नव्यानं चौकशी करावी अशी विनंती राज्य सरकार सीबीआयकडे करणार आहे. हिंदुत्ववादी सघटनांच्या कार्यप्रणालीची माहिती सरकारकडे सादर करण्याचे आदेश एटीएसला दिले असल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. असिमानंद याच्या कबुलीजबाबानंतर संघाच्या काही नेत्यांचे देशभरातल्या बॉम्बस्फोटांशी कसे संबंध आहेत यावर प्रकाश पडला. त्यामुळेच आता देशभरातल्या बॉम्बस्फोटप्रकरणांच्या तपासाला वेगळी दिशा मिळू शकते.

दरम्यान असिमानंद यांच्या कबुलीमुळे बॉम्बस्फोट आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या संबंधांवर चर्चा सुरू झाली. यामुळे मालेगाव स्फोटासंबंधी पकडलेल्या संशयितांच्या कुटुंबियांनी त्यांच्या सुटकेची मागणी केली. मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी निर्दोष असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला. तसेच मालेगाव स्फोटातले संशयित निर्दोष असतील तर त्यांची सुटका करण्यात यावी आणि त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

तर असिमानंद याच्या कबुलीजबाबाची दखल पाकिस्ताननंही घेतली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं इस्लामाबादमधल्या भारतीय राजदुताला बोलावून घेतलं. आणि 2007 मधल्या समझौता बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाची माहिती द्यावी अशी मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2011 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close