S M L

मुलीवर अत्याचार करणार्‍या दामप्त्याला अटक

अजित मांढरे,मुंबई14 जानेवारीमुंबईत घाटकोपर इथं एका दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या दामप्त्याला पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेश इथून मुलीचं संगोपन करण्याच्या बहाण्यानं आणून तिला घरकाम करायला भाग पाडल्याचंही आता उघड झालं. आता या चौधरी दाम्पत्याला जेलची हवा खावी लागली.मुंबईतील विक्रोळी कोर्टामधून एका आरोपाखाली जामीन मिळाल्यानंतर अनिल चौधरी आणि ज्योती चौधरी या दामप्त्याला तोंड लपवून पळण्याची तोंड लपवून पळण्याची वेळ आली. चौधरी दामप्त्यनं गेल्या दोन वर्षांपासून एका दहा वर्षाच्या एका चिमुकलीवर अतोनात अत्याचार केले. भातात पाणी जास्त झालं म्हणून या दामप्त्यानं त्या चिमुकलीचा हात जळत्या गॅसवर ठेवला या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना अटक केली पण कायद्याच्या पळवाटाखाली हे दोघं बाहेर पडलेत. भागलपूरहून या मुलीला शिक्षणासाठी या अनिल चौधरीनं या मुलीला आणलं होतं. पण शिक्षण तर नाही उलट त्या मुलीला घरकाम करुन घेत निट खायला प्यायलाही देत नव्हते. अनिल चौधरी आणि ज्योती चौधरीला कोर्टात हजर केलं असता त्यांना कोर्टानं जामीन दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2011 05:22 PM IST

मुलीवर अत्याचार करणार्‍या दामप्त्याला अटक

अजित मांढरे,मुंबई

14 जानेवारी

मुंबईत घाटकोपर इथं एका दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या दामप्त्याला पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेश इथून मुलीचं संगोपन करण्याच्या बहाण्यानं आणून तिला घरकाम करायला भाग पाडल्याचंही आता उघड झालं. आता या चौधरी दाम्पत्याला जेलची हवा खावी लागली.

मुंबईतील विक्रोळी कोर्टामधून एका आरोपाखाली जामीन मिळाल्यानंतर अनिल चौधरी आणि ज्योती चौधरी या दामप्त्याला तोंड लपवून पळण्याची तोंड लपवून पळण्याची वेळ आली. चौधरी दामप्त्यनं गेल्या दोन वर्षांपासून एका दहा वर्षाच्या एका चिमुकलीवर अतोनात अत्याचार केले. भातात पाणी जास्त झालं म्हणून या दामप्त्यानं त्या चिमुकलीचा हात जळत्या गॅसवर ठेवला या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना अटक केली पण कायद्याच्या पळवाटाखाली हे दोघं बाहेर पडलेत. भागलपूरहून या मुलीला शिक्षणासाठी या अनिल चौधरीनं या मुलीला आणलं होतं. पण शिक्षण तर नाही उलट त्या मुलीला घरकाम करुन घेत निट खायला प्यायलाही देत नव्हते. अनिल चौधरी आणि ज्योती चौधरीला कोर्टात हजर केलं असता त्यांना कोर्टानं जामीन दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2011 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close