S M L

महागाईच्या मुद्यावरुन मीडिया मला जबाबदार धरतो -शरद पवार

15 जानेवारीमहागाईच्या मुद्यावरुन प्रसारमाध्यमं मला जबाबदार धरतात. असं विधान कृषीमंत्री शरद पवार यांनी केलं. पुणे जिल्ह्यातल्या सोमेश्वर साखर कारखान्यात विविध प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाकिस्तानमधून कांदा आयात करण्याची मागणी केली जातेय. देशातल्या शेतकर्‍यांपेक्षा पाकिस्तानच्या शेतकर्‍यांना पैसा दिलेला चालेल काय ? असा सवालही यावेळी पवारांनी विचारला.तसेच कुठ आहे महागाई असं विचारत केंद्रीय कृषीमंत्र्यांनी महागाई अस्तित्त्वातच नसल्याचं वक्तव्य केलंय. पुण्यात आबेगाव इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महागाई असल्याचं मीडियालाच वाटतयं आणि त्यामुळेच सगळीकडे महागाईचा भ्रम होतोय असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर कांद्याच्या निर्यातबंदीबाबत आताच नाही तर चांगली आवक होऊ लागल्यावरच निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2011 09:20 AM IST

महागाईच्या मुद्यावरुन मीडिया मला जबाबदार धरतो -शरद पवार

15 जानेवारी

महागाईच्या मुद्यावरुन प्रसारमाध्यमं मला जबाबदार धरतात. असं विधान कृषीमंत्री शरद पवार यांनी केलं. पुणे जिल्ह्यातल्या सोमेश्वर साखर कारखान्यात विविध प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाकिस्तानमधून कांदा आयात करण्याची मागणी केली जातेय. देशातल्या शेतकर्‍यांपेक्षा पाकिस्तानच्या शेतकर्‍यांना पैसा दिलेला चालेल काय ? असा सवालही यावेळी पवारांनी विचारला.

तसेच कुठ आहे महागाई असं विचारत केंद्रीय कृषीमंत्र्यांनी महागाई अस्तित्त्वातच नसल्याचं वक्तव्य केलंय. पुण्यात आबेगाव इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महागाई असल्याचं मीडियालाच वाटतयं आणि त्यामुळेच सगळीकडे महागाईचा भ्रम होतोय असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर कांद्याच्या निर्यातबंदीबाबत आताच नाही तर चांगली आवक होऊ लागल्यावरच निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2011 09:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close