S M L

आदर्श सोसायटी पाडण्याचे निर्देश

16 जानेवारीमुंबई येथील कुलाबा स्थिर वादग्रस्त आदर्श सोसायटी पाडण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत आदर्शचं बांधकाम अवैध असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचं म्हणणं आहे. त्यामुळे आदर्शची संपूर्ण बिल्डींग पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आदर्शनं सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांचं म्हणणं आहे. तसेच आदर्शचं बांधकाम करताना पर्यावरण खात्याची परवानगी घेतली नाही असंही रमेश यांनी म्हटलं आहे. येत्या तीन महिन्यांत ही बिल्डींग पाडण्याची कारवाई करू असं रमेश यांनी स्पष्ट केलं.आदर्शची बिल्डींग पाडण्याबाबात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयापुढे 3 पर्याय होते 1. पूर्ण बिल्डींग पाडणे2. बिल्डींगचा काही भाग पाडणे3. बिल्डींग सरकारकडे हस्तांतरित करणेमात्र यापैकी पहिला पर्याय निवडण्यात आला. इतरांना चाप लावण्यासाठी आम्ही पहिला पर्याय निवडला असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.दरम्यान, आदर्श प्रकरणात नाव गुंतलेले राज्याचे माहिती आयुक्त रामानंद तिवारी आज राज्यपालांना भेटणार आहेत. राज्यपाल के. शंकरनारायणन यांना भेटून आपली बाजू मांडणार आहेत. तिवारी यांना राज्य सरकारनं राजीनामा देण्याची सुचना केली होती. मात्र त्यांनी ही सुचना धुडकावून लावत दीर्घ रजेवर जाण्याची पळवाट शोधली होती. मात्र त्यांचा हा रजेचा अर्ज राज्यपालांनी फेटाळला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिवारी यांना पदावरून हटवण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे केली होती. आता आज तिवारी राज्यापालांची भेट घेणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2011 08:43 AM IST

आदर्श सोसायटी पाडण्याचे निर्देश

16 जानेवारी

मुंबई येथील कुलाबा स्थिर वादग्रस्त आदर्श सोसायटी पाडण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत आदर्शचं बांधकाम अवैध असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचं म्हणणं आहे. त्यामुळे आदर्शची संपूर्ण बिल्डींग पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आदर्शनं सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांचं म्हणणं आहे. तसेच आदर्शचं बांधकाम करताना पर्यावरण खात्याची परवानगी घेतली नाही असंही रमेश यांनी म्हटलं आहे. येत्या तीन महिन्यांत ही बिल्डींग पाडण्याची कारवाई करू असं रमेश यांनी स्पष्ट केलं.

आदर्शची बिल्डींग पाडण्याबाबात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयापुढे 3 पर्याय होते

1. पूर्ण बिल्डींग पाडणे2. बिल्डींगचा काही भाग पाडणे3. बिल्डींग सरकारकडे हस्तांतरित करणे

मात्र यापैकी पहिला पर्याय निवडण्यात आला. इतरांना चाप लावण्यासाठी आम्ही पहिला पर्याय निवडला असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आदर्श प्रकरणात नाव गुंतलेले राज्याचे माहिती आयुक्त रामानंद तिवारी आज राज्यपालांना भेटणार आहेत. राज्यपाल के. शंकरनारायणन यांना भेटून आपली बाजू मांडणार आहेत. तिवारी यांना राज्य सरकारनं राजीनामा देण्याची सुचना केली होती. मात्र त्यांनी ही सुचना धुडकावून लावत दीर्घ रजेवर जाण्याची पळवाट शोधली होती. मात्र त्यांचा हा रजेचा अर्ज राज्यपालांनी फेटाळला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिवारी यांना पदावरून हटवण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे केली होती. आता आज तिवारी राज्यापालांची भेट घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2011 08:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close